सोने विकून कर्ज फेडले, ४० लाखांच्या सोन्याचा अपहार करणारा सुवर्ण कारागीर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 02:22 PM2021-06-16T14:22:27+5:302021-06-16T14:26:03+5:30

१९९४ पासून आरोपी अमरचंद या व्यवसायात आला. तेव्हापासून तक्रारदार हे त्यास विश्वासाने सोन्याची लगड देत आणि त्याच्याकडून दागिने तयार करून घेत.

Goldsmith arrested for embezzling Rs 40 lakh gold | सोने विकून कर्ज फेडले, ४० लाखांच्या सोन्याचा अपहार करणारा सुवर्ण कारागीर अटकेत

सोने विकून कर्ज फेडले, ४० लाखांच्या सोन्याचा अपहार करणारा सुवर्ण कारागीर अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल ८४५ ग्रॅम ९०० मिली ग्रॅम सोने हडपले

औरंगाबाद : श्रीनिकेतन कॉलनीतील मे. लालचंद मंगलदास सोनी जेम्स ॲण्ड ज्वेलर्स प्रा.लि.(एलएमएस) या सुवर्णपेढीच्या कारागिराने विश्वासघात करून तब्बल ४० लाख १८ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केल्याचे समाेर आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून क्रांती चौक पोलिसांनी त्यास अटक केली.

अमरचंद प्रेमचंद सोनी (रा. पानदरीबा), असे अटकेतील कारागिराचे नाव आहे. क्रांती चौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार उदय हरिदास सोनी (रा. समर्थनगर) यांची वडिलोपार्जित सुवर्णपेढी आहे. आरोपीचे वडील हे त्यांच्या दुकानात सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करीत. १९९४ पासून आरोपी अमरचंद या व्यवसायात आला. तेव्हापासून तक्रारदार हे त्यास विश्वासाने सोन्याची लगड देत आणि त्याच्याकडून दागिने तयार करून घेत. काही वेळा निम्म्याच सोन्याचे दागिने तयार होत. अलंकार घडविण्याची मजुरी त्यांना ते देत. अशाप्रकारे त्यांचा व्यवहार होत. १ एप्रिल २०२० पासून त्यांच्यातील व्यवहाराचा हिशेब झाला नव्हता. मार्च महिन्यात तक्रारदार यांनी आरोपी अमरचंद याला कॉल करून सोन्याचा हिशेब करू, असे सांगितले. तेव्हा तो राजस्थानला असल्याचे आणि तेथून आल्यावर हिशेब करू असे म्हणाला. मे महिन्यात पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला तेव्हाही तो राजस्थानमध्येच असल्याचे म्हणाला. 

यानंतर तक्रारदार यांनी केलेल्या हिशेबानुसार १ एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या कालावधीत त्यांच्या पेढीने अमरचंदला दागिने घडविण्यासाठी ३ किलो २७९ ग्रॅम ४९० मिलिग्रॅम सोन्याची लगड दिली. यापैकी त्याने २ किलो ४३३ ग्रॅम ५९० मिलिग्रॅमचे दागिने तयार करून दिले. त्याच्याकडे ४० लाख १८ हजार रुपये किमतीचे ८४५ ग्रॅम ९०० मिलिग्रॅम सोने शिल्लक असल्याचे समजले. आठ दिवसांपूर्वी आरोपी औरंगाबादला आल्यावर तक्रारदार यांनी त्यांना हिशेब विचारला असता त्याच्याकडे सोने नसल्याचे म्हणाला.

कर्जबाजारी झाल्याने सोने विकल्याची कबुली
तक्रारदार यांनी आरोपीला सोन्याचे दागिने अथवा लगड परत करण्यास सांगितले असता त्याने तो कर्जबाजारी झाल्याचे नमूद केले. तक्रारदार यांचे सोने विकून लोकांची देणी दिल्याची कबुली त्याने दिली. तुमचे साेने अथवा त्याची रक्कम सध्या तो देण्यास असमर्थ असल्याचे म्हणाला. आरोपीने विश्वासघात करून ४० लाख १८ हजार रुपयांच्या सोन्याचा अपहार केल्याची तक्रार मंगळवारी क्रांती चौक ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Goldsmith arrested for embezzling Rs 40 lakh gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.