सोने खरेदी करणारे फायद्यात; वर्षभरात पाच हजारांनी वाढले भाव!

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 6, 2024 02:09 PM2024-01-06T14:09:01+5:302024-01-06T14:10:01+5:30

भाव वाढले की, विक्रीवर आठ दिवस परिणाम होतोच

Gold buyers benefit; Prices increased by five thousand in a year! | सोने खरेदी करणारे फायद्यात; वर्षभरात पाच हजारांनी वाढले भाव!

सोने खरेदी करणारे फायद्यात; वर्षभरात पाच हजारांनी वाढले भाव!

छत्रपती संभाजीनगर : सोने-चांदी हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. होय, लग्नसराईत तर सोन्याच्या दागिन्यांत कोट्यवधींची विक्री होतेच; शिवाय साडेतीन मुहूर्त तसेच पाच वेळीस येणारा गुरुपुष्यामृत योग या शुभमुहूर्तावर सोने खरेदी केले जाते. यामुळे सोने व चांदीच्या भावात होणारी तेजी-मंदीकडे सर्वांचे लक्ष असते. मागील २०२३ च्या वर्षभरात सोने ५,१७६ रुपये (१० ग्रॅम) व चांदी किलोमागे ५,८२९ रुपयांनी तेजाळली. यामुळे खरेदी करणारे फायद्यात राहिले.


सोने-चांदीचे दर
महिना--------- सोने (प्रति तोळा)------ चांदी (प्रति किलो)

जानेवारी २०२३ ५८,१२४ रु. ६८,६७१ रु.
फेब्रुवारी            ५५,५५० रु. ६३,००० रु.
मार्च             ५९,५१२ रु. ७१,५८२ रु.
एप्रिल             ६२,००० रु. ७३,८६८ रु.
मे             ६०,३९० रु. ७०,९८८ रु.
जून             ५८,०५५ रु. ६८,४२९ रु.
जुलै             ५९,५६७ रु. ७३,८६० रु.
ऑगस्ट ५९,४८५ रु. ७४,६४५ रु.
सप्टेंबर ५७,७१० रु. ७१,५६० रु.
ऑक्टोबर ६१,२३८ रु. ७१,९३१ रु.
नोव्हेंबर ६२,६०७ रु. ७५,९३४ रु.
डिसेंबर ६३,२४६ रु. ७३,३९५ रु.
४ जानेवारी (२०२३) ६३,३०० रु. ७४,५०० रु.

सोने ५,००० हजारांनी वाढले
मागील वर्षाच्या सुरुवातीला ५८,१२४ रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव होता. त्यानंतर सोन्याचे भाव वाढतच गेले. दिवाळीत (नोव्हेंबर) ६२,६०७ रुपये दर होते. डिसेंबर महिन्यात ६३,२४६ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. शुक्रवारी ६३,७०० रुपयांना सोने मिळत होते. तोळ्यामागे ५,१७६ रुपयांनी सोने महागले. (यात तीन टक्के जीएसटीचा समावेश नाही) मागील वर्ष खरेदीदारांसाठी नफा कमविणारे राहिले.

चांदी ५,८०० हजारांनी वाढली
सोन्याप्रमाणे चांदीचे भावही तेजीत राहिले. मागील वर्षाच्या सुरुवातीला ६८,६७१ रुपये प्रति किलो चांदी विकली गेली होती. दिवाळीत नोव्हेंबरमध्ये ७५,९३४ रुपयांपर्यंत उच्चांकावर जाऊन पोहोचली. शुक्रवारी ७४,५०० रुपयांना चांदी विकली जात होती. (यात तीन टक्के जीएसटीचा समावेश नाही.)

भाव वाढले की, विक्रीवर आठ दिवस परिणाम होतोच
मागील वर्ष भर सोने-चांदीचे भाव वाढतच राहिले. भाववाढ झाले की, त्याचा आठ दिवस परिणाम सराफा बाजारपेठेवर होत असतो. नंतर पूर्ववत परिस्थिती होते. मात्र, कितीही भाववाढ होत राहिली तर साडेतीन मुहूर्त व गुरुपुष्यामृत व लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली नाही.
-आर.के. जालनावाला, ज्वेलर्स

 

Web Title: Gold buyers benefit; Prices increased by five thousand in a year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.