जेहूर येथे विषबाधा झाल्याने शेळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST2021-09-23T04:05:26+5:302021-09-23T04:05:26+5:30
हतनूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार मोकडे यांनी सांगितले की, बुधवारी ज्ञानेश्वर कचरू खैरनार यांच्या दोन शेळ्या दगावल्याची माहिती ...

जेहूर येथे विषबाधा झाल्याने शेळ्यांचा मृत्यू
हतनूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार मोकडे यांनी सांगितले की, बुधवारी ज्ञानेश्वर कचरू खैरनार यांच्या दोन शेळ्या दगावल्याची माहिती मिळाल्यानंतर जेहुर येथे जाऊन त्यांचे शवविच्छेदन केले. सदर शेळ्यांचा मृत्यू हा विषारी पाणी पिल्याने अथवा विषारी चारा खाल्ल्याने विषबाधा होऊन झाला आहे. या गावात अशाच पद्धतीने १ सप्टेंबरपासून आतापर्यंत ७५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यात ज्ञानेश्वर कचरू खैरनार १२, बबन दादा कांबळे १०, तुळशीराम मगन पवार १६, बाळासाहेब कचरू खैरनार १४, गोरख राजाराम खैरनार १, हरीदास पुंडलिक खैरनार ५, गणेश रूस्तूम खैरनार २, जनाबाई कचरू खैरनार ६, दादासाहेब परसराम खैरनार ३, रावसाहेब हरिभाऊ कदम यांच्या ६ शेळ्यांचा समावेश आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो :