स्मिता अवचार यांचा अधिसभेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST2021-03-06T04:05:31+5:302021-03-06T04:05:31+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत डॉ. स्मिता अवचार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कुलगुरु डॉ. ...

Glory to Smita Avchar in the Senate | स्मिता अवचार यांचा अधिसभेत गौरव

स्मिता अवचार यांचा अधिसभेत गौरव

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत डॉ. स्मिता अवचार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. येत्या ३१ मार्च रोजी डॉ. अवचार विद्यापीठ सेवेतून निवृत्त होत आहेत. अर्थसंकल्पीय चर्चा सुरू होण्यापूर्वी प्रा. फुलचंद सलामपुरे व डॉ.राजेश करपे यांनी डॉ. अवचार यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी कुलगुरु डॉ. येवले यांनी अवचार यांच्यासारख्या निष्ठावंत व अभ्यासू प्राध्यापकांची विद्यापीठाला नेहमीच गरज भासेल, त्यांची नंतरही वेळेनुसार सेवा घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांची उपस्थिती होती.

Web Title: Glory to Smita Avchar in the Senate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.