शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

मद्यपीचा प्रताप ! रॉंग साईड जाणाऱ्या सुसाट कारमुळे अनेकांचा जीव टांगणीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 5:01 PM

 बीडीडीएसच्या पोलिसांनी त्याला कारसह एमआयडीसी सिडको पोलिसाच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देबुधवारी रात्री सिडको बसस्थानकासमोर थरार घटनाबीडीडीएस पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले

औरंगाबाद: मद्यपी चालक काय करतील याचा अंदाज बांधणे कठीण असते. अशाच एका चालकाने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वसंतराव नाईक चौक ते सिडको बसस्थानक दरम्यान रॉंग साईड नेल्याने समोरून येणाऱ्या अनेक वाहनासोबतचा अपघात होता होता टळले . हा प्रकार पाहताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने पाठलाग करून कारचालकाला पकडून एम आय डी सी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुरुवारी रात्र ११ वाजेच्या सुमारास जळगांव रोडवर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. याचवेळी बॉम्ब शोधक आणि नाशकचे पथक सिडको बसस्थानकाची तपासणी करून बसस्थांकातून बाहेर पडले. तेव्हा त्यांच्यासमोर एस टी बस, कार आणि अन्य दुचाकी होत्या. एक जण कार (क्रमांक एम एच २० एफपी ४९७७) घेऊन अचानक वसंतराव नाईक चौकाकडुन (जळगांव टी )हर्सुल टी पॉईंटकडे जाण्यासाठी रॉंग साईडने आल्याचे वाहनचालकानी पाहिले. याचवेळी सिडको बसस्थानकातून बाहेर पडलेल्या बससोबत कारची धडक होण्याची शक्यता लक्षात घेऊन बस चालकाने बस चा वेग कमी केला. ही बाब दिसताच प्रत्यक्षदर्शी नागरीक आणि बॉंब शोधक आणि नाशक पथकाचे जवान सोनवणे, लोखंडे आणि अन्य पोलिसांनी रॉंगसाईड कारच्या दिशेने धाव घेतली.

यावेळी त्यांनी चालकाला कार थांबविण्याचे सांगितले. मात्र चालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि न थांबता तो सुसाट जाऊ लागला. यामुळे आणखी काही अंतर पायी पाठलाग करून सिडको पोलीस ठाण्यासमोर त्याला पकडण्यात आले. तेव्हाही तो कारमधून उतरत नव्हता. उलट कुणाला तरी मोबाईलवर कॉल करीत होता. नागरीक आणि पोलिसांनी त्यांच्या कार समोर उभे राहुन रोखले. कुणीतरी त्यांना स्टेअरिंगवरुन बाजुला केले आणि कार रस्त्यावरून बाजुला नेली. यानंतर याघटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आले. बीडीडीएसच्या पोलिसांनी त्याला कारसह एम आय डीसी सिडको पोलिसाच्या ताब्यात दिले.

त्या कारचालकाला दिले सोडूनबॉंब शोधक आणि नाशक पथकांतील पोलीस कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी पाठलाग करून कार पकडलेल्या कारचालकाला एम आय डी सी सिडको पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर कुणीही त्यांच्यावर तक्रार नोंदविली नाही. यामुळे त्याला रात्रीच पोलिसांनी सोडून दिल्याचे समजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद