‘ग्लोरियस’ चित्रांची मुंबईकरांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:35 IST2016-10-22T00:17:39+5:302016-10-22T00:35:23+5:30
लातूर : येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सातपुते यांनी काढलेल्या ‘ग्लोरियस’ चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर कला दालनात सुरू आहे.

‘ग्लोरियस’ चित्रांची मुंबईकरांना भुरळ
लातूर : येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सातपुते यांनी काढलेल्या ‘ग्लोरियस’ चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर कला दालनात सुरू आहे. १७ रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन २३ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांचा प्रतिसाद आहे.
बालपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या अविनाश सातपुते यांनी चित्रकलेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ग्लोरियस चित्र रेखाटण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी काढलेली चित्रे अनेकांना मुंबईतही भुरळ घालत आहेत. सध्या प्रदर्शनाला गर्दी होत आहे.(प्रतिनिधी)