अभय योजनेच्या लाभावर गंडांतर

By Admin | Updated: June 21, 2014 00:55 IST2014-06-21T00:22:29+5:302014-06-21T00:55:47+5:30

जालना : जालना नगर पालिकेकडील कोट्यवधी रुपयांच्या पथदिव्यांच्या वीज बिलांच्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने अभय योजनेचा लाभ दिला.

Glandan on the benefit of Abhay Yojna | अभय योजनेच्या लाभावर गंडांतर

अभय योजनेच्या लाभावर गंडांतर

जालना : जालना नगर पालिकेकडील कोट्यवधी रुपयांच्या पथदिव्यांच्या वीज बिलांच्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने अभय योजनेचा लाभ दिला. परंतु पालिकेने उर्वरित हप्ते थकवित कराराचा भंग केला. त्यामुळे या योजनेंतर्गत लाभावरच गंडांतर कोसळले आहे.
नगर पालिकेतील समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. गत दीड वर्षांपासून बंद असलेले पथदिवे अभय योजनेच्या आधारे सुरु झाले खरे. परंतु पालिकेने एक हप्ता भरल्यानंतर या योजनेकडे पाठ फिरविली आहे. परिणाम महावितरणने पुन्हा पथदिव्यांचा पुरवठा करण्याचा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील विविध भागातील पथदिवे थकित वीजबिल न भरल्याने दीड वर्षांपासून बंद होते. नगर पालिकेकडे महावितरण कंपनीचे पथदिव्यांच्या बिलाचे सुमारे १० कोटी ३७ लाख रुपये थकले होते. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच वेळोवेळी नोटिसाही जबावल्या. मात्र थकबाकी वसूल होत नसल्याने संपूर्ण शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. सुमारे दीड वर्षे शहर काळोखात राहिले. त्यामुळे शहरवासियांत प्रचंड नाराजी पसरल्यानंतर राजकीय व प्रशासकीय पातळीवर अनेक हालचाली झाल्या. पालकमंत्री व स्थानिक आमदारांनी शासनाकडून मोठ्या पाठपुराव्यानंतर महावितरणकडून अभय योजना मंजूर करुन घेतली. या योजनेतंर्गत जालना पालिकेने महावितरण कंपनीला १ कोटी ८० लाखांचा धनादेश वीजबिला पोटी दिला होता. तसेच उर्वरित बिलापोटी दरमहा दोन कोटींचा हप्ता देण्याचे ठरले होते. मात्र पालिकेने पहिला हप्ता भरल्यानंतर शहरातील पथदिवे कसेबसे सुरु केले. काही चौकांत एलईडी दिवे बसविले. शहर अंधारातून प्रकाश येत असतानाच आता पालिकेने योजनेकडे योजनेचा हप्ता थकविल्याने महावितरणने वसुलीसाठी पुन्हा नोटीस बजावली. तीही एकदा नव्हे तर दोन वेळा तसेच हप्ता न भरल्यास पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अभय योजनेवरच गंडांतर येण्याची शक्यता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
पालिकेला दोन वेळा बजावल्या नोटिसा
नगर पालिकेकडे पथदिव्यांची १० कोटी ३७ लाख रुपये थकबाकी झाली आहे. अभय योजने अंतर्गत काही रक्कम तसेच व्याज माफ करण्यात आले होते.
उर्वरित रक्कमेपोटी पालिकेला हप्ते पाडून देण्यात आले होते. यातील पालिकेने १ कोटी ८० लाख रुपयांचा भरणा महाितवरणकडे केला. तसेच पहिला हप्ताही भरला.त्यानंतर हप्ता रोखल्यामुळे महावितरणने पालिकेला दोन वेळा नोटिस बजावली आहे.
नगर पालिकेला मार्च २०१२ पासूनच्या थकबाकी वसुलीसाठी बारा हप्ते पाडून देण्यात आले होते. त्यापैकी केवळ एकच हप्ता भरण्यात आला आहे. पालिकेला ६० लाख रुपये प्रति महिना असा हप्ता पाडून देण्यात आला होता. मात्र पालिकेने हप्ते भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने हप्त्याच्या वसुलीसाठी महावितरण पालिकेकडे तगादा लावत आहे. पथदिवे बंद करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Glandan on the benefit of Abhay Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.