नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास वेळ द्या -दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:03 IST2021-08-23T04:03:26+5:302021-08-23T04:03:26+5:30

केंद्र सरकारने मला आणि डॉ. भागवत कराड यांना मंत्री पदाचा दर्जा दिल्याने आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू, असे ...

Give time to solve the problems of the citizens | नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास वेळ द्या -दानवे

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास वेळ द्या -दानवे

केंद्र सरकारने मला आणि डॉ. भागवत कराड यांना मंत्री पदाचा दर्जा दिल्याने आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू, असे दानवे म्हणाले. यादरम्यान ग्रामपंचायतकडून प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, प्रधानमंत्री सडक योजनेतून हतनूर घुसूर रस्ता, राष्ट्रीयीकृत बँक, भूमिगत गटारासाठी निधी द्यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपसरपंच नईम शेख यांच्यासह ग्रा.पं. सदस्य गजानन पेटारे, रामेश्वर वेताळ, संतोष बिडवे, वैभव सरोवर, आत्माराम परांडे, सचिन पेटारे, गणेश जाधव, समाधान आलिंग, यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, सचिव संजय गव्हाणे, उपाध्यक्ष संजय खंबायते, प्रवीण घुगे, गोपीनाथ वाघ, पं.स. सदस्य किशोर पवार, कैलास अकोलकर आदी उपस्थित होते.

---- फोटो

220821\20210821201234_img_0225_1.jpg

Web Title: Give time to solve the problems of the citizens