शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या

By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST

राजेश चोबे, सिल्लोडराज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.

राजेश चोबे, सिल्लोडदेशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यामुळे देशातून काँग्रेसला जनतेने हद्दपार केले आहे. राज्यातील अनेक तालुके पावसाअभावी दुष्काळाच्या खाईत जात आहेत, ही भीषण परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.सिल्लोड -सोयगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोरडे, जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर मोटे, पंचायत समितीचे गटनेते इद्रिस मुलतानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीरंग पाटील साळवे, नगरपालिकेचे गटनेते सुनील मिरकर, माजी सभापती अशोक गरुड, किरणदेवी जैस्वाल, राजेंद्र जैस्वाल, कैलास जंजाळ, डॉ. मच्छिंद्र पाखरे, गंगा ताठे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, तालुका अध्यक्ष दिलीप दाणेकर, सोयगावचे शिवाजी दुढाळ, रामभाऊ पठाडे, जयप्रकाश चौहान, अनिल खरात आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत लक्ष न दिल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. ठिबक सिंचन , जलसंवर्धन यासह शेतीला भरभराटी येईल, असे नियोजन न केल्याने कृषी विकासाला खीळ बसल्याचेही त्यांनी सांगितले.