‘६७.५० कोटींचे प्रलंबित अनुदान शेतकर्यांना द्या’
By Admin | Updated: May 14, 2014 00:41 IST2014-05-14T00:33:29+5:302014-05-14T00:41:51+5:30
जालना : शेतकर्यांचे ठिबक योजनेअंतर्गत ६७.५० कोटींचे अनुदान प्रलंबित असून ते वाटप करावे, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

‘६७.५० कोटींचे प्रलंबित अनुदान शेतकर्यांना द्या’
जालना : जिल्ह्यातील शेतकर्यांचे ठिबक योजनेअंतर्गत ६७.५० कोटींचे अनुदान प्रलंबित असून ते तात्काळ वाटप करावे, अशी मागणी खा. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी संयुक्तपणे राज्यातील अल्पभूधारक व बहूभूधारक शेतकर्यांना अनुक्रमे ४५ टक्के व ३५ टक्के अनुदान जाहीर केले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. त्याचा परिणाम शेतकर्यांचे सरासरी उत्पादन वाढीमध्ये झालेला दिसून येतो, असेही दानवे यांनी नमूद केले आहे. अनुदानामुळे शेतामध्ये ‘ठिबक सिंचन’ बसविण्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळला असून त्यासाठी काही शेतकर्यांनी बँकेकडून कर्ज प्रकरणे मंजूर करून तर काही शेतकर्यांनी खाजगी सावकाराकडून कर्जे घेऊन ठिबक सिंचनाची कामे केली आहेत. परंतु जालना जिल्ह्यातील शेतकर्यांचे ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने शेतकर्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. प्रलंबित अनुदान सन प्रलंबित रक्कम २०११ - १२ १२.५० कोटी २०१२ - १३ २५.०० कोटी २०१३ - १४ ३०.०० कोटी एकूण ६७.५० कोटी