जलस्त्रोत अधिग्रहणांची रक्कम तात्काळ द्या

By Admin | Updated: June 4, 2014 01:32 IST2014-06-04T00:41:12+5:302014-06-04T01:32:06+5:30

उस्मानाबाद : शासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेली रक्कम संबधित यंत्रणेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

Give the amount of water resources takeover immediately | जलस्त्रोत अधिग्रहणांची रक्कम तात्काळ द्या

जलस्त्रोत अधिग्रहणांची रक्कम तात्काळ द्या

उस्मानाबाद : शासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेली रक्कम संबधित यंत्रणेच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. ती रक्कम तात्काळ संबधित मालक व शेतकर्‍यांना उपलब्ध करुन द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यंत्रणेला दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाई परिस्थितीबाबत सोमवारी विशेष कार्यगटाची आढावा बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी नारनवरे यांनी हे निर्देश दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जे. टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, कळंब, भूम, उमरगा येथील उपविभागीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तांगडे, महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भालेराव, सरकारी अभियोक्ता व्ही. बी. शिंदे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात किती विंधन विहिरींचे कामे सुरु आहेत व किती बंद आहेत याचा अभियंतानिहाय आढावा सादर करावा. पुढील काळात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जून, जुलै आणि आॅगस्ट २०१४ साठीचे नियोजन करणे, पावसाळयात पाणी वाहून जाऊ नये यासाठी पाणी पुनर्भरण कामांचा आराखडा तयार करणे, सिंमेट नाला बंधारेच्या कामांचे टेंडरची प्रक्रिया पूर्ण करुन कामे सुरु करणे, रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करुन घेणे, आदीनचा जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. (प्रतिनिधी) ६३ टँकर, १४४ अधिग्रहणे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या परिस्थितीत जिल्ह्यात ६० गावे व ९ वाडयात मिळून ६३ टँकरणे पाणी पुरवठा केला जात आहे. तर ९६ गावात १४४ विहिर बोअरचे अधिग्रहण करुण पाणीटंचाईवर मात करण्यात येत असल्याचे सांगितले.

Web Title: Give the amount of water resources takeover immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.