डिकसळमध्ये मुलीची आत्महत्या

By Admin | Updated: December 9, 2015 00:40 IST2015-12-09T00:38:55+5:302015-12-09T00:40:55+5:30

कळंब : वडिल आपल्याला भावाप्रमाणे खर्चासाठी पैसे देत नसल्याचा राग मनात धरून एका १५ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली़

Girl's suicide in Diksal | डिकसळमध्ये मुलीची आत्महत्या

डिकसळमध्ये मुलीची आत्महत्या

 

कळंब : वडिल आपल्याला भावाप्रमाणे खर्चासाठी पैसे देत नसल्याचा राग मनात धरून एका १५ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली़ ही घटना मंगळवारी दुपारी कळंब शहरानजीकच्या डिकसळ येथे घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे़ डिकसळ भागातील सम्राट अशोक चौक परिसरात युवराज वाघमारे (रा.देवधानोरा.ह.मू डिकसळ,कळंब) हे राहतात़ युवराज वाघमारे हे मंगळवारी दुपारी आपला मुलगा आकाश व मुलगी प्रियंका यांच्यासोबत घरात बसले होते़ त्यावेळी प्रियंका हिने ‘तुम्ही आकाशला पैैसे देता, पण मला देत नाहीत’ असे म्हणून रागाच्या भरात घरात जावून दार लावून घेतले़ ती नेहमीप्रमाणे रागाने घरात गेल्याचा समज झाल्याने तिचे वडिल बाहेर गेले़ काही वेळानंतर युवराज वाघमारे हे घरी आले आणि त्यांनी प्रियंका हिला हाक मारली़ मात्र, तिचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आकाश याने खिडकीचे दार लाकडाने मारून उघडले असता प्रियंकाने पत्र्याच्या आडूस ओढणीने गळफास घेतल्याचे समोर आले़ याबाबत मिराबाई वाघमारे यांच्या माहितीवरून कळंब पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Girl's suicide in Diksal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.