तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: April 18, 2016 00:41 IST2016-04-18T00:29:22+5:302016-04-18T00:41:08+5:30

नांदेड : शहरातील तेहरानगर भागात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली़

The girl's suicide | तरुणीची आत्महत्या

तरुणीची आत्महत्या

नांदेड : शहरातील तेहरानगर भागात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली़ याप्रकरणी तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपाखाली तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
प्रियंका ऊर्फ प्रीती प्रीतम भुसेवार (वय १८) हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते़ त्यातच त्या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला होता़ यावरुन कंटाळलेल्या प्रियंका हिने १५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली़
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेत, पंचनामा केला़ मृत्यूपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यावरुन पोलिसांनी प्रियंका हिच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला़ पोलिसांनी ती चिठ्ठीही ताब्यात घेतली़
याप्रकरणात मयत प्रियंका हिची आई मीनाक्षी भुसेवार यांनी तक्रार दिली असून या प्रकरणाचा तपास पोउपनि काशिद करीत आहेत़
(प्रतिनिधी)

Web Title: The girl's suicide