मुलींची आघाडी ९३.५१ टक्क्यांनी कायम

By Admin | Updated: June 3, 2014 00:29 IST2014-06-02T23:52:34+5:302014-06-03T00:29:21+5:30

हिंगोली : मागील दोन वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींनी गुणवत्तेत घेतलेली आघाडी यंदा कायम राखली असतानाच निकालात वाढ केली.

Girls' lead also shot up by 9 3.51 percent | मुलींची आघाडी ९३.५१ टक्क्यांनी कायम

मुलींची आघाडी ९३.५१ टक्क्यांनी कायम

हिंगोली : मागील दोन वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींनी गुणवत्तेत घेतलेली आघाडी यंदा कायम राखली असतानाच निकालात वाढ केली. विशेष म्हणजे पाचही तालुक्यात मुली मुलांपेक्षा पुढे असताना जिल्ह्यात ९३.५१ टक्के गुण संपादन केले. त्यातील औंढा तालुक्यात मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करीत ९६.१५ टक्के घेतले असून केवळ ८ मुलींना अपयश आले. जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत तितकासा पुढारलेला नाही. शिक्षणाचा आलेख उंचावण्यासाठी शाससनाने मानव विकास मिशनचा कार्यक्रम राबविला जातो. गतवर्षी तीन तालुक्यात १५ बसेस मुली विद्यार्थिनींसाठी धावतात. त्याचा फयादा मुलींनी उचलल्याने बारावीच्या निकालात विधायक परिणाम दिसून आले. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मुलींनी टक्केवारीत आघाडी घेतली. हिंगोली तालुक्यात ७६८ पैकी ७६६ मुलींनी दिलेल्या परीक्षेत ७१० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हिंगोलीत मुलांनी ९०.२४ टक्के घेतले असताना मुलींनी ९२.६९ टक्के मिळविले. मानव विकास मिनशचा कार्यक्रम कार्यरत नसताना कळमनुरी तालुक्यात मुलांचा ८८.९५ तर मुलींनी ९४.१५ टक्के गुण प्राप्त करीत ६३२ पैकी ५९५ मुलींनी बाजी मारली. कळमनुरीच्या पुढे वसमत तालुक्यातून सर्वाधिक १ हजार ६८ पैकी १ हजार ६७ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यातील १ हजार ७ मुली उत्तीर्ण होत ९४. ३८ टक्के मिळविले असताना मुलांना ८८.९० टक्क्यांवर समाधान मानावे लागले. शिक्षणाच्या बाबातीत सारख्याच समजल्या जाणार्‍या सेनगाव आणि औंढा तालुक्यातील निकालात तफावत आहे. मुले आणि मुलींच्या निकालात औंढ्याने बाजी मारीत ९२.९ टक्के गुण मिळविले. औंढ्यातून २३४ पैकी २३४ मुलींनी दिलेल्या परीक्षेत केवळ ८ मुलींना उत्तीर्ण होण्यात कमी पडल्या. परिणामी या तालुक्याचा निकाल ९६.१५ टक्क्यांवर गेला. दुसरीकडे सेनगाव तालुक्यात २९२ पैकी २९२ विद्यार्थिनींनी दिलेल्या परीक्षेत २६० मुलींनी यश संपादन केले. प्रामुख्याने जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहांची संख्या कमी आहे. बसेस वेळेवर नाहीत, अशा स्थितीत मुलींनी मिळविलेल्या या यशाचे कौतुक होत आहे. विशेष जिल्ह्यात गावातून येणार्‍या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रवास करूनही जिल्ह्यातील मुलींनी अभ्यासात मुलांनी पिछाडीवर सोडले. (प्रतिनिधी)८ विद्यालये @ १०० टक्के हिंगोली : मागील वर्षी नाममात्र दोन विद्यालयांना १०० टक्के यश मिळविता आले असताना यंदा ८ विद्यालयांनी बाजी मारली. विशेषत: वसमत तालुक्यातील ५ विद्यालयांचा यात समावेश असून कळमनुरी आणि सेनगाव तालुक्याला भोपळा फोडता आलेला नाही. उर्वरित हिंगोली आणि औंढा तालुक्यातील अनुक्रमे १ आणि २ विद्यालयांना हे यश संपादन करता आले. जिल्ह्यातील ८ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी १०० विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यालयांचा यात समावेश आहे. गतवर्षी हिंगोलीच्या गणेशवाडी येथील उर्दु कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच्या सर्व १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. दुसरीकडे वारंगा फाटा येथील लिमरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४१ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के यश मिळविले होते. गतवर्षी वसमत तालुक्यातील एकाही विद्यालयास १०० टक्के यश मिळविता आले नव्हते. यंदा तब्बल ५ विद्यालयांनी शतप्रतिशत यश मिळविले आहे. तालुक्यातील हट्टा येथील सिद्धेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातील ७ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. उल्लेखनीय बाब म्हणजे वसमत येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयाचे कौतुक होत आहे. येथील परीक्षेला बसलेल्या १५ पैकी १५ विद्यार्थ्यांनी यश संपादिले. दुसरीकडे वसमत शहरातील एम. एन. कुरेशी उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय आणि कुरूंदा येथील कै. झुनाजी पाटील इंगोले उर्दू उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुक्रमे १४ आणि १५ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. याच तालुक्यातील अकोली येथील कैै. कांचनदेवी उच्च माध्यमिक विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी इतिहास घडविला. हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील कोणार्क विद्यालयातील तिन्हीही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. औंढा तालुक्यातील मेथा येथील रामदास आठवले उच्च माध्यमिक विद्यालयातील चारही विद्यार्थ्यांनी यश संपादिले. तसेच चिंचोली येथील रेणूकामाता उच्च माध्यमिक विद्यालयातील ५ विद्यार्थ्यांनी बाजी मारली.(प्रतिनिधी)कळमनुरी : निकाल ९०.८७ टक्केकळमनुरी : औरंगाबाद बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कळमनुरी तालुक्याचा निकाल ९०.८७ टक्के लागला आहे. तालुक्यात बारावी परीक्षेला १७८८ विद्यार्थी बसले होते. यातील १७८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १६३ विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत. तालुक्यात २१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तालुक्यात सर्वात जास्त निकाल दांडेगावच्या छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९७.८३ टक्के तर सर्वात कमी निकाल कळमनुरी येथील स्व. शिवरामजी मोघे सैनिकी कनिष्ठ महाविद्यालयाचा ५.८८ टक्के लागला आहे. शहरातील गुलाम नबी आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.२५ टक्के लागला आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा निकाल ९४.९७, कै. शंकरराव सातव महाविद्यालय ९६.१५, राजर्षी शाहू महाविद्यालय आखाडा बाळापूर ९४.५५, नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर ८४.३६, गोकुळ कनिष्ठ महाविद्यालय येहळेगाव गवळी ९१.०३, कै. बापुराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय डोंगरकडा ९४.९८, हिरामन खंडारे महाविद्यालय खरवड ५० टक्के, शिवपुरी महाराज महा.नांदापूर ९४.७४, कै. बाबाराव नाईक महाविद्यालय वरुड तांडा ८९.४१, राधाराम कनिष्ठ महाविद्यालय रामेश्वर तांडा ८७.३२, रविंद्रनाथ टागोर महाविद्यालय वाकोडी ६१.५४, कै. साहेबराव सावंत महाविद्यालय शेवाळा ७७.७८, शासकीय आश्रमशाळा जामगव्हाण ९७.२२, लिमरा महाविद्यालय वारंगा फाटा ९६.७७, कै. डॉ. शंकरराव सातव जवळा पांचाळ ९३.१०, राजर्षी शाहू महाराज कुर्तडी ५७.१४, म. फुले कामठा फाटा ८९.४७ तर ढोलक्याची वाडी येथे कनिष्ठ महाविद्यालयाचा ८४.२१ टक्के निकाल आहे. (वार्ताहर)तालुक्यात बारावी परीक्षेला एकच रिपीटर विद्यार्थी बसला होता. अन् तोही या परीक्षेत अनुतीर्ण झाला आहे. रिपीटरसहित तालुक्याचा बारावी परीक्षेचा ९०.८२ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील महात्मा फुले, कामठा फाटा, कनिष्ठ महाविद्यालय येथून एक रिपीटर विद्यार्थी परीक्षेला बसला होता.

Web Title: Girls' lead also shot up by 9 3.51 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.