ट्रेलरच्या धडकेने तरुणी ठार

By Admin | Updated: August 17, 2014 01:44 IST2014-08-17T01:28:53+5:302014-08-17T01:44:19+5:30

औरंगाबाद : सिमेंटची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रेलरने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणी ठार झाली.

The girl killed by the trailer | ट्रेलरच्या धडकेने तरुणी ठार

ट्रेलरच्या धडकेने तरुणी ठार

औरंगाबाद : सिमेंटची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रेलरने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणी ठार झाली. ही घटना १५ आॅगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिर ते शिवाजीनगर रस्त्यादरम्यान घडली.
अनुजा शरद राजहंस (१८, रा.ज्योतीनगर) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले की, अनुजा ही सागर रत्नाकर शेळके (२२, रा.रामगोपालनगर) याच्या सोबत मोटारसायकलने गजानन महाराज मंदिर चौकाकडून शिवाजीनगरकडे जात होती. याप्रसंगी तेथून जात असलेल्या १६ चाकी मालवाहू ट्रेलरने (क्र.एमएच-२६-एच-७५६५) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अनुजा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सागरने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रेलरचालक भारत वाघमारे यास पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.

Web Title: The girl killed by the trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.