जायंटस् सहेलीवर पुरस्कारांचा वर्षाव

By Admin | Updated: December 17, 2015 00:10 IST2015-12-16T23:56:21+5:302015-12-17T00:10:48+5:30

औरंगाबाद : जायंटस् ग्रुप आॅफ औरंगाबाद सहेलीला जायंटस् इंटरनॅशनल फेडरेशनच्या समारंभात दहापेक्षा अधिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Giants Girlfriend Award Shows | जायंटस् सहेलीवर पुरस्कारांचा वर्षाव

जायंटस् सहेलीवर पुरस्कारांचा वर्षाव

औरंगाबाद : जायंटस् ग्रुप आॅफ औरंगाबाद सहेलीला जायंटस् इंटरनॅशनल फेडरेशनच्या समारंभात दहापेक्षा अधिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहेली ग्रुपला पहिल्यांदाच एवढे पुरस्कार मिळाले आहेत.
जायंटस् इंटरनॅशनल फेडरेशनतर्फे नुकताच शहरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनेनिर्माते किरण व्ही. शांताराम, वर्ल्ड चेअरमन दिनेश मालानी, राजेश जोशी, फेडरेशनच्या अध्यक्ष सूर्यमाला मालानी, रवींद्र मालानी, अशोक थोरात आदींची उपस्थिती होती. यावेळी सहेली ग्रुपच्या अध्यक्ष नंदा मुथा यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले.
अ‍ॅड. आशा राख, सुजाता जैस्वाल, वीणा तालिकोटकर यांनाही अवॉर्ड देण्यात आले. यावेळी कांचन जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

Web Title: Giants Girlfriend Award Shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.