केंद्र सरकारचा कारभार हवेत; टेलिव्हिजनच्या माध्यमातून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:29 IST2017-08-14T00:29:07+5:302017-08-14T00:29:07+5:30
संघ परिवार सोडता सारेच घटक असुरक्षित असल्याचा आरोप आज येथे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रपरिषदेत केला.

केंद्र सरकारचा कारभार हवेत; टेलिव्हिजनच्या माध्यमातून !
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेत, टेलिव्हिजनच्या माध्यमातून चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून येताना दिलेल्या साºया आश्वासनांचा विसर पडला आहे आणि केवळ स्वत:चा एक अजेंडा राबविण्यात ते मश्गुल आहेत. त्यांच्यामुळे संघ परिवार सोडता सारेच घटक असुरक्षित असल्याचा आरोप आज येथे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रपरिषदेत केला.
ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी औरंगाबादेत आले होते. गोरखपूर येथे आॅक्सिजनअभावी मुलांच्या मृत्यूस योगी आदित्यनाथ सरकार जबाबदार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही आझाद यांनी यावेळी
केली.
त्यांनी सांगितले की, गोरखपूर हा आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे; पण मी केंद्रीय आरोग्यमंत्री असताना १७ वेळा गोरखपूरच्या त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे.
नुकतीच दिल्लीत केंद्र सरकारविरोधी रणनीती आखण्यासाठी यूपीएची बैठक झाली. त्याला यूपीएचे सारे घटक पक्ष उपस्थित होते; परंतु राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित नव्हते. त्यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात होते. याकडे लक्ष वेधता गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, मी शरद पवारांना त्या दिवशी फोनद्वारे संपर्क साधला होता; परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत; पण ते यूपीएबरोबरच आहेत.