घाटी रुग्णालयातील आंतरवासीता डॉक्टर संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:40 IST2020-10-13T13:39:43+5:302020-10-13T13:40:20+5:30
internship doctor on strike at Aurangabad शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या आवारात एकत्र येत कोविड भत्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी जोरदार घोषणा दिल्या.

घाटी रुग्णालयातील आंतरवासीता डॉक्टर संपावर
ठळक मुद्देआंतरवासिता डॉक्टरांना या भत्त्याची प्रतीक्षा
औरंगाबाद : राज्यभरातील आंतरवासिता डॉक्टरांना (इंटर्न)कोविड भत्ता दिला जात आहे. परंतु घाटीतील आंतरवासिता डॉक्टरांना या भत्त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. हा भत्ता देण्याच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी मंगळवारी संप सुरू केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या आवारात एकत्र येत कोविड भत्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी जोरदार घोषणा दिल्या. आंतरवासिता डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची भेट घेऊन मागणी मांडली. भत्ता मिळाला नाही तर कोविड वॉर्डात रुग्णसेवा दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.