शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नात्यामध्ये लग्न करताय, मग ‘सावधान’! मेजर थॅलेसिमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:05 IST

भीतीपोटी अनेक लोक आपण थॅलेसेमिया मायनर असल्याचे सांगत नाहीत.

औरंगाबाद : शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. जवळच्या नात्यात लग्न करण्याचे प्रमाण जास्त असलेल्या समाजात थॅलेसेमिया अधिक प्रमाणात आढळून येतो. त्याबरोबरच दोन ‘मायनर थॅलेसेमिया’ग्रस्तांनी विवाह केला, तर जन्माला येणारे मूल ‘थॅलेसेमिया मेजर’ राहण्याची शक्यता असते. अशा मुलांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते. ही स्थिती दूर होण्यासाठी विवाहापूर्वी कुंडलीपेक्षा रक्तचाचणी करून थॅलेसिमिया आहे की नाही, हे पाहा, असे तज्ज्ञांनी म्हटले.

दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेत बाराशे रुग्ण आहेत. औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीकडे २६३ रुग्णांची नोंदणी असून, या रुग्णांना २१ दिवसांनी रक्त द्यावे लागते. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने हा आजार होतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून रुग्णास जीवदान मिळू शकते; परंतु बोन मॅरो जुळणे फार महत्त्वाचे ठरते.

मायनर तरुण राष्ट्रीय खेळाडू; पणशहरात एक ‘थॅलेसेमिया मायनर’ असलेली तरुणी राष्ट्रीय खेळाडू आहे. पतीही मायनर असल्याने ७ वर्षांच्या मुलीस थॅलेसेमिया मेजर आहे. दर २८ दिवसांनी रक्त द्यावे लागत असल्याची खंत तरुणीने व्यक्त केली.

खबरदारी घेता येतेभीतीपोटी अनेक लोक आपण थॅलेसेमिया मायनर असल्याचे सांगत नाहीत. अधिकाधिक जागृती व्हावी. दोन मायनर व्यक्तींचे लग्न झाले, तर मेजर थॅलेसेमियाग्रस्त मूल जन्माला येणार नाही, याची खबरदारी घेता येते.-अनिल दिवेकर, सचिव, औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी

शहरात किमान ७ टक्के लोकऔरंगाबाद जिल्ह्यात लोकसंख्येच्या ५ ते ७ टक्के म्हणजे जवळपास ७० हजार लोक थॅलेसेमिया मायनर असू शकतात. दोन मायनर व्यक्तीमुळे मेजर रुग्ण जन्माला येण्याची भीती असते. त्यामुळे लग्नाआधी तपासणी करून आपण मायनर तर नाही ना, ही खात्री करावी.-डाॅ. महेंद्रसिंग चौहान

मोफत डे केअर सेंटरसिडको, एन-२ येथे थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मोफत डे केअर सेंटर सुरू करण्यात येत असून, रविवारी सेंटरचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे रुग्ण, पालकांचा महिन्याकाठी ५ ते ८ हजारांचा खर्च वाचेल, अशी माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष कैलास अवचरमल, अनिल दिवेकर आणि डाॅ. महेंद्रसिंग चौहान यांनी दिली.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य