सोयगाव तालुक्यात भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : त्रिवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:16+5:302020-12-24T04:06:16+5:30
सोयगाव येथील शिवसेना कार्यालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी युवानेते अब्दुल समीर, बाजार ...

सोयगाव तालुक्यात भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : त्रिवेदी
सोयगाव येथील शिवसेना कार्यालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी युवानेते अब्दुल समीर, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, दिलीप मचे, मारोती वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्रिवेदी म्हणाले की, ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी १७ उमेदवार शिवसेनेचे निवडून आणण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. सत्तेचा फायदा ग्रामपंचायतपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवानेते अब्दुल समीर म्हणाले की, सोयगाव हे विकासाचे मॉडेल झाले पाहिजे. त्यासाठी शिवसेना ताकदीने उभी राहण्याची गरज आहे. या बैठकीला शहरप्रमुख संतोष बोडखे, डॉ. अस्मिता पाटील, ध्रृपताबाई सोनवणे, एकनाथ महाजन, रवींद्र काटोले, चंदास रोकडे, रमेश गव्हांडे, दिलीप गव्हांडे, दिलीप देसाई, श्रीराम चौधरी, मोतीराम पंडित, राधेशाम जाधव, अक्षय काळे, महेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
-------
फोटो : शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी.