मग्रारोयो प्रस्ताव मंजुरीला गती मिळेना
By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T00:59:32+5:302014-08-31T01:09:03+5:30
भूम : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत जनावरांसाठी गोठा करण्यासाठीच्या योजनेचे काम संथ गतीने सुरु असून, शासकीय व लोकप्रतिनिधींकडून या योजनेसाठी गती देण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

मग्रारोयो प्रस्ताव मंजुरीला गती मिळेना
भूम : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत जनावरांसाठी गोठा करण्यासाठीच्या योजनेचे काम संथ गतीने सुरु असून, शासकीय व लोकप्रतिनिधींकडून या योजनेसाठी गती देण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
तालुक्यात जून २०१४ मध्ये यासाठी अर्ज मागणी करण्यात आली. या योजनेत भूमिहीनास प्राधान्य आहे. तर एका ग्रामपंचायतने फक्त ५ प्रस्ताव देणे बंधनकारक होते. तालुक्यात जून २०१४ पासून जवळपास ७४ पैकी ४३ ग्रामपंचायतकडून एकूण ४०७ प्रस्ताव प्रारंभी दाखल झाले. ते प्रस्ताव दाखल करुन बराच कालावधी उलटला तरी मंजुरी दिली नाही. दरम्यान, नंतरच्या काळात या ४०७ प्रस्तावाची तपासणी, छाननी केली असता, शासनाच्या निकषाप्रमाणे अनेक प्रस्तावात पूर्तता केली नसल्यामुळे तर काही प्रस्तावांमध्ये जादा क्षेत्र असल्यामुळे हे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतला फेर सादर करावेत, अशा लेखी सुचनेनुसार हे प्रस्ताव फेर सादर करण्यात आले.
दरम्यान, या ४०७ प्रस्तावांपैकी १४ प्रस्ताव प्राप्त असून, यापैकी १० प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन ४ ठिकाणी कामे सुरु झाली आहेत. यातील एक काम पूर्ण झाले आहे. ४ प्रस्तावांवर तांत्रिक मान्यतेसाठी कार्यवाही सुरु असल्याचे पं.स. कडून सांगण्यात आले. (वार्ताहर)