२७ लाख पुस्तके प्राप्त

By Admin | Updated: June 13, 2014 00:38 IST2014-06-13T00:22:53+5:302014-06-13T00:38:38+5:30

नांदेड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ लाख १८ हजार ५४५ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा गटस्तरावर झाला आहे़

Get 27 million books | २७ लाख पुस्तके प्राप्त

२७ लाख पुस्तके प्राप्त

नांदेड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ लाख १८ हजार ५४५ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा गटस्तरावर झाला आहे़
जिल्ह्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो़ त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार २५३ विद्यार्थ्यांसाठी २२ लाख २१ हजार ४२० पाठ्यपुस्तकांची आणि ७ लाख ८५ हजार ६०६ स्वाध्यायपुस्तिकांची मागणी करण्यात आली होती़ त्यात जिल्ह्यासाठी २१ लाख ३५ हजार ८४३ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत़ तर ५ लाख ८२ हजार ७०२ स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत़ जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ७४ हजार ५३३ आहे़ तर उर्दू माध्यमाचे १७ हजार २४० विद्यार्थी आहेत़ मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे़ या स्कूलच्या विद्यार्थ्यांची संख्या ४८० आहे़
ही प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके आणि स्वाध्यायपुस्तिका गटस्तरावर वितरीत करण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यात नांदेड गटासाठी पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका असे एकूण १ लाख ५९ हजार २३२ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ तर अर्धापूर गटासाठी १ लाख २६ हजार ५५, मुदखेड ८६ हजार २०९, लोहा २ लाख २६ हजार १८९, कंधार २ लाख ४६ हजार ५७२, देगलूर २ लाख २ हजार ६४८, नायगाव १ लाख ७९ हजार ५८५, मुखेड ३ लाख १६ हजार ४३८, बिलोली १ लाख १२ हजार ५३, धर्माबाद ९५ हजार ५९१, उमरी ९६ हजार ७३८, भोकर १ लाख ५७ हजार ८३, हदगाव २ लाख ३३ हजार ३००, हिमायतनगर १ लाख १३ हजार १७१, किनवट गटासाठी २ लाख ५९ हजार ४१४ आणि माहूर गटासाठी १ लाख ८ हजार २६७ पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका प्राप्त झाल्या आहेत़
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी पाठ्यपुस्तके वितरण व वाटपासंदर्भात गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ (प्रतिनिधी)
पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ देण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती जि़प़चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनी दिली़ शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना शाळास्तरावर दिल्या आहेत़ या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असेही कऱ्हाळे यांनी स्पष्ट केले़

Web Title: Get 27 million books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.