सामान्य माणसांचा नेता काळाच्या पडद्याआड

By Admin | Updated: February 17, 2015 00:38 IST2015-02-17T00:19:05+5:302015-02-17T00:38:15+5:30

उस्मानाबाद : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. हे वृत्त उस्मानाबाद जिल्ह्यात धडकताच राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.

General man behind the scenes of the blacksmith | सामान्य माणसांचा नेता काळाच्या पडद्याआड

सामान्य माणसांचा नेता काळाच्या पडद्याआड


उस्मानाबाद : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. हे वृत्त उस्मानाबाद जिल्ह्यात धडकताच राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या या जिंदादील नेत्यास मान्यवरांनी शोकसंदेशाद्वारे श्रध्दांजली अर्पण केली.
माजी गृहमंत्री आऱआऱपाटील हे एक कुशल नेतृत्व होते़ सर्वांना सोबत घेवून काम करणारा एक नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते़ ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव आग्रेसर राहत़ कितीही मोठ्या पदावर असले तरी सर्वसामान्यांना आपले समजून वागविणारा, कार्यकर्त्यांना जपणाऱ्या अशा या प्रामाणिक नेत्याच्या अकाली निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले.
- ओमप्रकाश राजेनिंबाळकर,
माजी आमदार
खडतर वाटचालीतून उच्च पदापर्यंत वाटचाल़ ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण घेणारे आऱआऱ यांचा उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे़ ग्रामविकास मंत्री पदाला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवले़ त्यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा इनोने गौरव केला होता़ त्यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे़ त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
डॉ़ पद्मसिंह पाटील, माजी खासदार
उमदे नेतृत्व हरपले
४आबांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे़ सामान्यांना आपलसं वाटणारे हे उमदे नेतृत्व अनेक वर्षापासून राज्याच्या नव्हे तर देशाच्या जनतेला नैतिकतेने ही राजकारण करता येते, हे दाखवत होते़ पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख कायम ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता़ मी राज्यमंत्री म्हणून काम करत असताना ते उपमुख्यमंत्री होते़ त्यांच्या सहवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या़ त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात व समाजकारणात त्यांची उणीव जाणवेल.
- आ. राणाजगजितसिंह पाटील
ग्रामीण मातीशी नाते जोडणारे नेतृत्व गेले
४आबा हे शालेय जीवनापासूनच वक्तृत्वशैलीत अग्रेसर होते. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे त्यांना राजकारणात संधी मिळाली. ते सर्वसामान्यांचे कैवारी होते. माणसातील माणूस शोधण्याचे कौशल्य त्यांना प्राप्त झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे ग्रामीण मातीशी नाते जोडणारे नेतृत्व, या भूमिकेतून पाहत होते. त्यांना मंत्रीपदाचा गर्व कधीही नव्हता. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण दिले. अशा या कतृत्त्ववान नेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली.
- ज्ञानराज चौगुले, आमदार

Web Title: General man behind the scenes of the blacksmith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.