गेवराईत धरणे आंदोलन
By Admin | Updated: January 9, 2017 23:37 IST2017-01-09T23:35:17+5:302017-01-09T23:37:46+5:30
गेवराई : येथे सोमवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

गेवराईत धरणे आंदोलन
गेवराई : येथे सोमवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जि.प.चे अध्यक्ष विजयसिंह पंडित, कृउबा समितीचे सभापती भाऊसाहेब नाटकर, आप्पासाहेब गव्हाणे, जालिंदर पिसाळ, संग्राम आहेर, रावसाहेब देशमुख, कुमार ढाकणे, समाधान मस्के, आनंद सुतार, संदीप मडके, नगरसेवक शाम येवले, ॠषिकेश बेदरे, दत्ता पिसाळ, गुफरान इनामदार, माधव चाटे, धम्मपाल कांडेकर आदी उपस्थित होते. तहसीलदार आशिष बिरादार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विजयसिंह पंडित यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. काळ्या पैशावाले मोकाट व सामान्यांना मात्र त्रास असे सरकारचे धोरण आहे. आगामी निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना जागा दाखवील, असा इशारा त्यांनी दिला आहे. कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)