कन्नडमध्ये पोलिसांनी पकडला गावठी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:03 IST2021-09-18T04:03:57+5:302021-09-18T04:03:57+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सपोनि बालाजी वैद्य, पोना केसरसिंग राजपूत, जिवनसिंग लोधवाल, राहुल ...

कन्नडमध्ये पोलिसांनी पकडला गावठी कट्टा
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सपोनि बालाजी वैद्य, पोना केसरसिंग राजपूत, जिवनसिंग लोधवाल, राहुल लहाने यांनी पिशोर नाक्यावरील फळविक्रेत्यांच्या हातगाडीजवळ सापळा रचला. १० वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयित सुनील भाऊराव मोरे (३२, रा. गराडा, ता. कन्नड) या तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याजवळील बॅगची झडती घेतली असता ११ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, १ हजार रुपये किमतीच्या दोन मॅग्झिन व एक पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या एका मॅग्झिनमध्ये ३, तर दुसऱ्यात ५ असे एकूण ८ जिवंत काडतुसे आढळली. याप्रकरणी सहायक फौजदार उत्तम औटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन खटके करीत आहेत.
170921\img-20210917-wa0082.jpg
गावठी कट्टा व इतर मुद्देमाल