पालिका ‘सीओ’ंच्या टेबलावर टाकला कचरा

By Admin | Updated: May 21, 2015 00:29 IST2015-05-21T00:24:15+5:302015-05-21T00:29:03+5:30

नळदुर्ग : घरासमोरील व गल्लीतील कचरा उचलला जात नसल्याचे सांगत शहरातील एका नागरिकाने नगर पालिकेचे नगराध्यक्ष व अधीक्षकाच्या टेबलावर कचरा टाकला.

The garbage on the table of 'CO' | पालिका ‘सीओ’ंच्या टेबलावर टाकला कचरा

पालिका ‘सीओ’ंच्या टेबलावर टाकला कचरा


नळदुर्ग : घरासमोरील व गल्लीतील कचरा उचलला जात नसल्याचे सांगत शहरातील एका नागरिकाने नगर पालिकेचे नगराध्यक्ष व अधीक्षकाच्या टेबलावर कचरा टाकला. या प्रकरणी संबंधिताविरूद्ध नळदुर्ग ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील नसीम सलीम शेख (वय २२) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पालिकेमध्ये जावून गटारीतील कचरा नगराध्यक्ष, कार्यालयीन अधीक्षक यांच्या टेबलावर फेकला. तसेच टेलिफोन, फाईल अस्थाव्यस्त फेकून दिल्या. वारंवार मागणी करूनही पालिकेकडून शहरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई केली जात नाही. तसेच कचराही वेळेवर उचलला जात नसल्याचा आरोप शेख यांनी केला. दरम्यान, शेख यांनी सरकारी कामामध्ये अडथळा अनल्याची तक्रार कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे यांनी दिली. त्यावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास हेकॉ. अकोसकर हे करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: The garbage on the table of 'CO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.