उद्योगनगरीत खुल्या भूखंडावर टाकतात कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:51+5:302021-06-24T04:04:51+5:30

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरील फोस्टर कंपनीलगत एमआयडीसीच्या खुल्या भूखंडावर कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा ...

Garbage is dumped on open plots in industrial areas | उद्योगनगरीत खुल्या भूखंडावर टाकतात कचरा

उद्योगनगरीत खुल्या भूखंडावर टाकतात कचरा

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरील फोस्टर कंपनीलगत एमआयडीसीच्या खुल्या भूखंडावर कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा संचार वाढला असून, दुर्गंधीमुळे कामगार व नागरिक त्रस्त झाले आहे.

एमआयडीसीच्या भूखंडावर जोगेश्वरी ग्रामपंचायतलगतचे कारखानदार व व्यावसायिक केर-कचरा आणून टाकतात. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, या मार्गावरून नाक दाबूनच ये-जा करावी लागते आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीमार्फत घंटागाडीतून या खुल्या भूखंडावर केर-कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप अरुण पठारे यांनी केला आहे. पाऊस पडल्यानंतर कचरा जागेवरच सडत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून अस्वच्छतेमुळे माशाही वाढल्या आहे. मोकाट जनावरे व वराह यांचाही या परिसरात संचार वाढला आहे. स्वच्छतेचे धडे देणाऱ्या जोगेश्वरी ग्रामपंचायतीकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने नागरिकांत असंतोष आहे. ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी हा कचरा पेटवून देत असल्याने धुराचे प्रदूषणही होत आहे. कचरा पेटविल्यानंतर वाऱ्यामुळे आग लागण्याची भीतीही जोगेश्वरीवासीयांना सतावत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून उघड्यावर कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जात नाही.

ग्रामपंचायतीमार्फत एमआयडीसीकडून बीओटी तत्वावर सुरू करण्यात आलेल्या खासगी कंपनीकडे प्रक्रिया करण्यासाठी कचरा पाठविला जातो.

गजानन बोंबले, सरपंच.

फोटो ओळ- वाळूज उद्योगनगरीतील फोस्टर कंपनीलगत खुल्या भूखंडावर अशाप्रकारे केर-कचरा साचला आहे.

फोटो क्रमांक- कचरा १/२

--------------------------

Web Title: Garbage is dumped on open plots in industrial areas