औरंगाबादच्या शहागंजमध्ये पेटविला कचरा, जळाली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:16 IST2018-03-13T00:16:08+5:302018-03-13T00:16:15+5:30

शहागंज परिसरातील एका सिनेमागृहाजवळ उभी कार जळून खाक झाली. अनेक दिवसांपासून पडून असलेला कचरा कोणीतरी पेटविल्याने त्याचा भडका कारपर्यंत उडाला आणि ही घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. ही घटना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

Garbage burnt in Aurangabad's Shahganj, burnt cars | औरंगाबादच्या शहागंजमध्ये पेटविला कचरा, जळाली कार

औरंगाबादच्या शहागंजमध्ये पेटविला कचरा, जळाली कार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहागंज परिसरातील एका सिनेमागृहाजवळ उभी कार जळून खाक झाली. अनेक दिवसांपासून पडून असलेला कचरा कोणीतरी पेटविल्याने त्याचा भडका कारपर्यंत उडाला आणि ही घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. ही घटना सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले की, शहागंज परिसरातील मोहन टॉकीजच्या मागे भिंतीलगत अज्ञात कारमालकाने त्यांची जुनी कार (क्रमांक एमएच-२० बीवाय ४०९६) उभी करून ठेवली होती. या कारशेजारीच कचºयाचा ढीग पडलेला होता. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोणीतरी कचरा पेटविला. आग कारपर्यंत गेली आणि कारने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेची नोंद सिटीचौक ठाण्यात घेण्यात आली. मात्र कारचे मालक कोण आहे हे समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Garbage burnt in Aurangabad's Shahganj, burnt cars