वाळूजमध्ये गॅरेज शेडला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:58 IST2019-06-05T22:58:29+5:302019-06-05T22:58:38+5:30
बंद गॅरेजच्या शेडला आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे.

वाळूजमध्ये गॅरेज शेडला आग
वाळूज महानगर : बंद गॅरेजच्या शेडला आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना बुधवारी वाळूज लगत औरंगबाद-नगर महामार्गावर घडली.
शरिफ (पूर्ण नाव माहित नाही) यांनी हाफीज खान पठाण यांचे वाळूज लगत असलेले पत्र्याचे शेड भाड्याने घेतले आहे.तेथे ते गॅरेज चालवतात. बुधवारी रमजान ईदचा सण असल्याने गॅरेज बंद होते.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास बंद गॅरेजमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वाळूज पोलिसांना याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा ते २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत गॅरेजमधील रॉ मटेरियल, गॅस कटर आदी साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.