शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सातारा पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:48 IST

या टोळीने मालवाहू ट्रकचालकांना मारहाण करून लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. 

औरंगाबाद : पैठण लिंक रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या सहा संशयितांना अटक करण्यात सातारा पोलिसांना शुक्रवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास यश आले. या टोळीने मालवाहू ट्रकचालकांना मारहाण करून लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. 

विजय भगवानराव कांबळे (वय २८,रा. दत्तनगर,रांजणगाव एमआयडीसी), सलीम मोहम्मद यार शेख (वय २२,रा.एकतानगर, वाळूज), सोमीनाथ श्रीराम चंदेले(वय २२,रा. कदीम टाकळी, ता. गंगापुर), अजय मुरलीधर आदमाने (वय २०,रा. मुकुंदवाडी), अनिकेत प्रकाशराव जाधव (रा. मुकुंदवाडी) आणि अशिष सुरेश काळे (वय २१,रा.जयभवानीनगर)अशी अटकेतील संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. या टोळीतील किशोर शिंदे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना सातारा ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून पैठण लिंक रोड आणि कांचनवाडी येथे दरोडा पडला होता. शिवाय  वाहनचालकांना रात्री एक ते चार वाजेदरम्यान लुटमार होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी शनिवारी रात्री याच परिसरात गस्तीवर होते. सपोनि मनोज बहुरे हे गस्तीवर असताना रात्री सव्वा वाजेच्या सुमारास त्यांना पैठण लिंकरोडवरील गोलवाडी शिवारातील खड्ड्यामध्ये काही जण बसलेले दिसले. 

बहुरे यांनी ही बाब गस्तीवरील अन्य पोलीस उपनिरीक्षक  सागर कोते, पोलीस उपनिरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक चेतन उगले, उपनिरीक्षक डोईफोडे,  कर्मचारी कैसर पटेल, प्रदीप ससाणे, मोहन चव्हाण, सुनील धुळे, कारभारी नलावडे, कपील खिल्लारे, तळपे आणि देठे यांना देत तातडीने मदतीसाठी बोलावले. 

सर्व पोलिसांनी संशयितांना चोहोबाजुने घेरले तेव्हा संशयित आरोपी पोलिसांना पाहुन पळून जाऊ लागले. सात जणांपैकी चार जण पोलिसांच्या हाती लागले तर तीन जण अंधारात पळून गेले. त्यावेळी आरोपींकडे एक तलवार, दोरी, मिरची पावडर, दोन मोबाईल आणि एक दुचाकी होती. पकडलेल्या आरोपींनी पळून गेलेल्यांची नावे किशोर शिंदे आणि अशिष काळे, अनिकेत जाधव अशी सांगितली. पोलिसांनी नंतर काळे आणि जाधव यांना पकडून आणले.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर