लोणीचे गणपती हैदराबादच्या बाजारात

By Admin | Updated: July 30, 2014 00:49 IST2014-07-30T00:20:25+5:302014-07-30T00:49:04+5:30

नितीन कांबळे, कडा एकीकडे गणरायाच्या भक्तांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचीही लगबग वाढली आहे.

Ganesha of butter in the market of butter | लोणीचे गणपती हैदराबादच्या बाजारात

लोणीचे गणपती हैदराबादच्या बाजारात

नितीन कांबळे, कडा
एकीकडे गणरायाच्या भक्तांना गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचीही लगबग वाढली आहे. आष्टी तालुक्यातील लोणी येथील मूर्तीकार संतोष शिंदे यांनी बनविलेल्या मूर्र्तींना तर आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे मागणी आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी २०० पेक्षा अधिक मूर्ती हैदराबाद येथील बाजारात पाठविल्या आहेत.
गेल्या काही वर्षात देशातील कानाकोपऱ्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होऊ लागली आहे. गणरायाच्या भक्तांना ही तर पर्वणीच असते. शिवाय गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेक व्यावसायिकांचीही चलती असते. लोणी येथील कुंभार समाजातील पांडुरंग शिंदे हे १९८८ पासून मनमोहक गणरायाच्या मूृर्ती बनवितात. त्यांची ही कला त्यांचा मुलगा संतोष शिंदे व सून संगीता यांनी अवगत केली आहे. संतोष व संगीता यांनी आपल्या कलेला अधिकच पैलू पाडले. यासाठी त्यांना कचरू राजापुरे यांचेही मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्यांच्या कलेचा गवगवा आता परराज्यातही दुमदुमू लागला आहे.
संतोष व संगीता गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस गणरायांच्या सुबक मूर्ती तयार करतात. त्यांना साजेसे रंगही देऊन मूर्तीमध्ये जीव आणतात.
पाच इंचापासून ते पाच फुटांपर्यंत उंची असलेल्या मूर्ती शिंदे दाम्पत्य बनवितात. या मूर्ती अतिशय देखण्या असल्याने त्यांना विविध गणेश मंडळांकडून मागणी असते. दगडूशेठ, सावकार, लालबाग, मद्रास, दहिहंडी, साईबाबा, बालगणेश , अष्टविनायक, शंख, मंगलमूर्ती, कमळ, लोड सावकार, पद्मासन, गौरी- गणपती, जास्वंद, सिंह प्रबळ अशा ६७ आकारातील विविध गणेशमूर्ती बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. या मूर्र्तींना हैदराबाद येथेही चांगली मागणी आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक मूर्ती तेथे पाठविल्या आहेत.

Web Title: Ganesha of butter in the market of butter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.