शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Ganesh Visarjan: ताटकळून आ. जैस्वाल निघून गेल्यावर शिवसेना नेते खैरे आले, त्यानंतर सुरू झाली विसर्जन मिरवणूक

By योगेश पायघन | Published: September 09, 2022 10:54 PM

सिडको हडकोची गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान शिंदे गटाचे आमदार जैस्वाल आणि शिवसेना नेते खैरे एकत्र आले नाही

औरंगाबाद : गुलाल, फुलांची उधळण, ढोल ताशांचा गजरात श्रद्धापुर्वक गणेश भक्त विसर्जन विहिरीकडे शुक्रवारी दुपारीपासून वाजत गाजत रवाना होत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत बाप्पा ला निरोप गणेशभक्त देत होते. हे चित्र सिडको परिसरात रात्री उशिरापर्यंत होते. यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची कोंडी केली. ३ तास ताटकळून आ. प्रदीप जैस्वाल निघून गेल्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री यांच्या हस्ते सिडको हडकोतील मिरवणुकीला शुक्रवारी दुपारी चार वाजता सुरुवात झाली. 

सिडको हडको गणेश महासंघाच्या मिरवणूकीचा शुभारंभ एन ६ येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, बाळासाहेब थोरात, सुदाम सोनवणे, विश्वनाथ स्वामी, अनिल पोलकर, शिवाजी दांडगे, मकरंद कुलकर्णी, अशोक वीरकर, अशोक मिरकर, वीरु गादगे, राजू खरे, राजू इंगळे, गणेश नावंदर, अध्यक्ष सागर शेलार, शंकर भरती, रवि तांगडे, प्रमोद फुलारी, संदीप लघाने, प्रतीक अंकुश, सिडको व्यापारी गणेश मंडळाचे ओंकार प्रसाद, साहिल लुंगारे आदींसह गणेशभक्त उपस्थित होते. 

आ. जैस्वाल गेल्यावर खैरे आलेआ. प्रदीप जैस्वाल मिरवणुकीच्या वेळेपूर्वी १२ वाजेपासून एन ६ येथे दाखल झाले. त्यांनी जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही ढोल पथकाचे मंडळ सलामीला आले नाही. त्यामुळे सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह आ. जैस्वाल वैतागून निघून गेले. तोच विश्वनाथ स्वामी यांचे मनाचे मार्तंड ढोल व ध्वज पथक साडेतीनच्या सुमारास दाखल झाले. मंडळ जमवाजमव सुरू असताना नेहमी उशिरा पोहचणारे माजी खासदार खैरे तिथे पोहचले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. 

भाजप पदाधिकारी तापलेशिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांना गेल्यावर मिरवणुक उदघाटनाची तयारी केल्याचा सूर दांडगे यांनी लावला. त्यांना खैरे यांनी समजावले. तोच मंत्री सावे दाखल झाले. त्यांना फेटा बांधल्यावर मिरवणूक उदघाटन समारंभ सुरू झाला. या सोहळ्यावर शिवसेनेची छाप दिसली. स्टेजवर हा प्रकार विसंवादातून झाला यात गैरसमज होऊ नये असे स्वामींनी स्पष्टीकरण देत. सिडको हडको महासंघ पदाधिकाऱ्यांना फटकारले. हा वाद वाढू नये म्हणून मंत्री सावे व माजी खासदार खैरे यांनी कार्यकर्त्यांना समजावून मिरवणुकीला सुरुवात केली.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालAtul Saveअतुल सावे