शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Ganesh Visarjan : भाजपने बडविला ढोल; शिवसेनेला कानठळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:20 PM

शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले.

औरंगाबाद : शहरात शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाचा गदारोळ सुरू असून, त्याचे पडसाद रविवारच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत उमटले. भाजपने पश्चिम मतदारसंघाच्या श्री गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी क्रांतीचौकातून स्वतंत्र मिरवणुकीचा ढोल बडविला. त्या आवाजाने शिवसेनेच्या कानठळ्या बसल्या. विसर्जन मिरवणुकीचा नवीन पायंडा यंदाच्या उत्सवातून पडला असून, पुढील वर्षी पश्चिम मतदारसंघाचा स्वतंत्र गणेश मंडळ महासंघ स्थापन करण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

संस्थान गणपती येथून पारंपरिक श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघते. यावर्षीही तेथूनच श्री विसर्जन मिरवणूक निघाली; परंतु पश्चिम मतदारसंघातील गणेश मंडळांनी सिटीचौक ते गुलमंडी मार्गे जि.प.मैदानावर जाण्यास विरोध केला. त्यामागे कारणही तसेच होते, एक ते दीड महिना ढोल-ताशे व इतर कवायतींसाठी मेहनत करायची आणि मंडळांना त्यांचे सादरीकरण करण्यासाठी १० मिनिटेदेखील त्या मार्गावर मिळत नाहीत. मागील काही वर्षांपासून हा सगळा प्रकार घडत असल्यामुळे यंदा पश्चिम मतदारसंघाच्या मंडळांच्या बाजूने भाजपचे किशनचंद तनवाणी, बाळासाहेब गायकवाड, संदीप बारवाल, गजानन बारवाल यांनी ताकद लावली.

दुपारी ३ वा. क्रांतीचौक येथे श्री विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांनी जल्लोषात आगेकूच केली, तेथे पोलिसांनी मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची हमी मिळाल्यानंतर क्रांतीचौकातून जल्लोषात मिरवणूक सुरुवात झाली. सर्व गणेशभक्तांना मंडळांच्या कवायती जवळून पाहता आल्या. पाच ते सहा तासांपर्यंत मंडळाने थकेपर्यंत कवायती सादर करून औरंगाबादमधील श्रीगणेशभक्तांचे पारणे फेडले.

सेनेची झाली कोंडीभाजपने पश्चिम मतदारसंघातील मंडळांच्या मागणीला उचलून धरले. तेथे शिवसेनेची  मात्र गोची झाली. सुरुवातीला आ.संजय शिरसाट क्रांतीचौकात आले, परंतु खा.चंद्रकांत खैरेंनी त्यांना संस्थान गणपती येथे येण्यास सांगितले. तिकडे पक्ष आणि इकडे मतदारसंघ अशा कोंडीत आ.शिरसाट सापडले होते. तनवाणी, गायकवाड, बारवाल यांना खा.खैरे यांनी राजाबाजार येथे बोलावले, मात्र ते काही तिकडे गेले नाहीत. तनवाणी यांनी सांगितले की, क्रांतीचौक ते टिळकपथ मार्गे आलेल्या श्री मंडळांना कवायती सादर करण्याची संधी मागील काही वर्षांत पहिल्यांदाच मिळाली. रस्ता मोठा व रुंद असल्यामुळे सर्व काही सुरळीत पार पडले. पुढील वर्षी परवानगीचा मुद्दा राहणार नाही, तसेच भडकलगेट ते मिल कॉर्नर ते जि.प.मैदान असा नवीन मार्ग पुढच्या वर्षी सुरू केला जाईल. बेगमपुऱ्यातील सर्व मंडळांना त्याचा फायदा होईल.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद