वृक्षदिंडीने गांधी चमन दुमदुमले
By Admin | Updated: July 26, 2014 00:41 IST2014-07-26T00:06:59+5:302014-07-26T00:41:17+5:30
जालना : पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण व्हावी म्हणून लोेकमत संस्काराचे मोती ग्रीन किडस् २०१४ या स्पर्धेंतर्गत
वृक्षदिंडीने गांधी चमन दुमदुमले
जालना : पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण व्हावी म्हणून लोेकमत संस्काराचे मोती ग्रीन किडस् २०१४ या स्पर्धेंतर्गत शुक्रवारी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन तसेच लेझिम व पावली खेळत वृक्ष दिंडी काढली. या दिंडीमुळे गांधी चमन परिसर दणाणून गेला.
डबलजीन भागातील किड्स केंब्रिज व अंकुर बालक मंदिरातील विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी पाना फुलांनी पालखी सजविली. त्या पालखीत रोपटी ठेवण्यात आली होती. स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी त्यांचा गणवेश परिधान केला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात हिरवेगार रोपटे शोभून दिसत होते.
या रोपट्यांनी शहराची शोभा वाढविली होती. विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन तसेच लागवडीसाठी जनजागृतीपर घोषणा दिल्या.
फलक झळकविले. किड्स केंब्रिज शाळा ते स्काऊट गाईड मैदानापर्यंत मोठी वृक्ष दिंडी काढण्यात आली. स्काऊट गाईड मैदानावर वृक्षारोपण करुन दिंडीचा समारोप झाला.
यावेळी मुख्याध्यापिका अलका गव्हाणे, जिल्हा आयुक्त स्काऊट सुनील पांडे, जिल्हा आयुक्त गाईड विमलताई आगलावे, जिल्हा सचिव श्रीरंग बोंद्रे, सहसचिव गाईड अख्तरजहाँ कुरेशी, पराग खुजे, प्रिया अधाने, छाया खंडागळे, रसिका पोखरकर, श्रद्धा वाघमारे, शबनर सिद्दीक, सुचिता कुलकर्णी, रीना निर्मळ, विशाल नाकोडे, पुणम दायमा, हसमुख सुरवैय्ये, स्वाती शिंदे, पायल कठ्ठर, कविता नरोडे, आशा कदम आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
वृक्ष संवर्धनाचा संकल्प
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनासाठीही प्रचार व प्रसार करु असा संकल्प यावेळी सोडला. प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत करण्यात आले.
५०० वृक्षांचे रोपण
लोकमत परिवार व किडस् केंब्रिजच्या वतीने स्काऊट गाईड मैदानावर ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात बदाम, निलगिरी, गुलमोहर,चिंंच, आंबा आदी विविध झाडांचा समावेश होता. यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.