शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

G20 Summit: छत्रपती संभाजीनगरचे मुख्य रस्ते बनले सेल्फी पॉइंट! रात्री २ पर्यंत नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:24 IST

अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहर चकाचक झाले. शहराचे बदलेले हे रूप नागरिकांना प्रचंड विलोभनीय वाटत आहे.

छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरात सौंदर्यीकरणाची प्रचंड कामे करण्यात आली. प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रोषणाई, पाण्याचे कारंजे, सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले. दररोज संध्याकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत नागरिक सहकुटुंब सेल्फी काढण्यासाठी जालना रोड, सुभेदारी इ. भागांत गर्दी करीत आहेत. या गर्दीला आवर घालण्यासाठी पाेलिसांना दखल घ्यावी लागत आहे.

महापालिका दरवर्षी किमान ४०० ते ५०० कोटी रुपयांची विकास कामे करते. ही कामे ११५ वॉर्डांमध्ये असतात. लोकप्रतिनिधी कधीच मुख्य रस्ते, सौंदर्यीकरण याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे शहर सौंदर्यीकरणावर मागील चार दशकांत एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही. पर्यटक, उद्योजक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शहराची ब्रँडिंग आवश्यक आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला ब्रँडिंगची मोठी संधी चालून आली. राज्य शासनाने महापालिकेला सढळ हाताने ५० कोटींची मदत केली. या शिवाय जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, महावितरण इ. शासकीय कार्यालयांनीही जवळपास ५० काेटी रुपये खर्च केले. अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहर चकाचक झाले. शहराचे बदलेले हे रूप नागरिकांना प्रचंड विलोभनीय वाटत आहे. महावीर चौक ते चिकलठाण्यापर्यंत नागरिक सहकुटुंब दुचाकी, चारचाकीवर मनोहारी दृश्य आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी येत आहेत. कारंजे, ग्लो गार्डनच्या झाडांजवळ उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह नागरिकांना आवरत नाही.

पोलिस म्हणाले, आता घरी जा...सिडको बसस्थानक चौकात तर शनिवारी रात्री १.३० वाजता अनेक नागरिक सेल्फी काढत होते. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी नागरिकांना ‘आता पुरे झाले, घरी जा’ असा प्रेमाचा सल्ला दिला. सिडको बससस्थानक ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतचा रस्ताही आकर्षक दिवे, झाडांनी सजविण्यात आला. हर्सूल टी पॉइंट येथेही नागरिक आवर्जून सेल्फी काढत होते. सलीम अली सरोवरात दिवे, पाण्याचे कारंजे लावले. या ठिकाणीही अनेक कुटुंब रात्री उशिरापर्यंत होते. लेबर कॉलनी, रंगीन गेट, जिल्हाधिकारी निवासस्थान, टाउन हॉल उड्डाणपुलावरही गर्दी बघायला मिळाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका