G20 Summit: रुचकर मेजवानी! वूमन्स-२० च्या सदस्यांना आवडले मिक्स मिलेट्ची थालीपीठ
By बापू सोळुंके | Updated: February 27, 2023 18:12 IST2023-02-27T18:11:27+5:302023-02-27T18:12:03+5:30
जी २० परिषदेच्या निमित्ताने वूमन्स २० चे सदस्य कालपासून शहरात मुक्कामी आहेत.

G20 Summit: रुचकर मेजवानी! वूमन्स-२० च्या सदस्यांना आवडले मिक्स मिलेट्ची थालीपीठ
- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर: जी-२० परिषदेनिमित्त कालपासून शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आंतरराष्ट्रीय सदस्यांच्या सकाळच्या नाश्त्यांच्या मेणुमध्ये मिक्स मिलेट्स थालीपीठ हा आगळावेगळा पदार्थ होता. या सदस्यांनी मोठ्या आवडीने हा पदार्थाचा आस्वाद घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.
२०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जगभर साजरे केल्या जात आहे. जी २० परिषदेसाठी शहरात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाला सकस पदार्थ खाण्यास देण्याची योजना कृषी विभागाने समोर आणली होती. हे पदार्थ निवडण्यासाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून मिक्स मिलेट पराटा, ज्वारी,नाचणींचे लाडू, ज्वारी, नाचणींचा केक, मिक्स मिलेट्स कस्टर्ड फ्रुट स्लाड हे चार पदार्थ निवडले होते. या खाद्य पदार्थांची रेसिपी कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख आणि उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांनी हॉटेल ताज विवांता आणि रामा इंटरनॅशनलच्या मुख्य शेफ यांना दिला होता.
जी २० परिषदेच्या निमित्ताने वूमन्स २० चे सदस्य कालपासून शहरात मुक्कामी आहे. या शिष्टमंडळाला सोमवारी सकाळी नाश्त्यामध्ये असलेल्या विविध पदार्थांसोबत मिक्स मिलेट्स थालीपीठ होते. हे थालीपीठ आंतरराष्ट्रीय सदस्यांना आवडल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.