G20 Summit: परदेशी पाहुणे शहर भ्रमंतीवर; बीबी- का- मकबरा पाहून म्हणाले 'वाह ताज!'

By संतोष हिरेमठ | Published: February 28, 2023 09:02 AM2023-02-28T09:02:14+5:302023-02-28T09:04:28+5:30

बीबी का मकबरा येथे गुलाबपुष्प देऊन प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.

G20 Summit: Foreign guests say 'Wow Taj!' after visiting Bibi ka maqbara | G20 Summit: परदेशी पाहुणे शहर भ्रमंतीवर; बीबी- का- मकबरा पाहून म्हणाले 'वाह ताज!'

G20 Summit: परदेशी पाहुणे शहर भ्रमंतीवर; बीबी- का- मकबरा पाहून म्हणाले 'वाह ताज!'

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत वुमन-२० परिषदेसाठी ऐतिहासिक आणि पर्यटननगरीत दाखल झालेल्या पाहुण्यांनी मंगळवारी सकाळी ‘दख्खन का ताज’ म्हणून ओळख असलेल्या बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणीला भेट दिली. मकबरा पाहून ' वाह ताज' अशी प्रतिक्रिया परदेशी पाहुण्यांनी दिली.

पाहुण्यांनी प्रारंभी औरंगाबाद लेणीला भेट दिली. त्यानंतर 
बीबी का मकबरा येथे भेट दिली. बीबी का मकबरा येथे गुलाबपुष्प देऊन प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद मंडळाचे अधीक्षक डाॅ. शिव कुमार भगत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहायक संजय रोहणकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: G20 Summit: Foreign guests say 'Wow Taj!' after visiting Bibi ka maqbara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.