पाणीपुरवठ्याशी फारकत : आंदोलने कंपनीच्या आवारातअ

By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:46:48+5:302014-12-09T01:01:25+5:30

ौरंगाबाद : पाणीपुरवठा आणि मनपाचा काहीही संबंध नाही, नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी निगडित तक्रारी, आंदोलने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आवारात करावीत.

Furious with water supply: | पाणीपुरवठ्याशी फारकत : आंदोलने कंपनीच्या आवारातअ

पाणीपुरवठ्याशी फारकत : आंदोलने कंपनीच्या आवारातअ


ौरंगाबाद : पाणीपुरवठा आणि मनपाचा काहीही संबंध नाही, नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी निगडित तक्रारी, आंदोलने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आवारात करावीत. यासाठी मनपा प्रभाग अधिकारी विभागप्रमुखांना पत्र देण्याच्या तयारीत आहेत. या शिवाय आंदोलकांनी यापुढे मनपा कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, तर त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याची परवानगीदेखील वरिष्ठांकडून मागण्यात येणार आहे.
१ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठ्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे आहे. त्यामुळे मनपाचा पाणीपुरवठ्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. नागरिकांनी मनपा कार्यालयाच्या आवारात आंदोलने केली तरी कार्यालय बंद करणे, साहित्याची तोडफोड करण्याची गरजच नाही. नागरिकांनी त्यांच्या मागण्या, तक्रारी, आंदोलने ही कंपनीचे मुख्य कार्यालय, कॉल सेंटरवर केली पाहिजेत, असा सूर अधिकाऱ्यांनी आज आळविला.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका प्रभाग अधिकाऱ्याने सांगितले की, यापुढे पाण्यासाठी आमच्या प्रभाग कार्यालयात आंदोलन झाले, तर नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात येईल. नागरिकांनी कंपनीकडे आपले गाऱ्हाणे केले पाहिजे.
कंपनीकडे तक्रारी केल्या तर तातडीने काम होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. दुसरीकडे मनपातील अधिकारी पाणीपुरवठ्याप्रकरणी हात वर करीत आहेत. टँकरने पाणीपुरवठा होण्यासाठी पैसे कुठे भरायचे, या प्रकरणीदेखील कंपनीचे
अधिकारी उपलब्ध नाहीत. पाणीपुरवठा न झाल्यास काय करायचे, दूषित पाणी आल्यावर कुणाकडे तक्रार करायची, याबाबत दाद कुणाकडे मागावी असा नागरिकांचा सवाल आहे.

Web Title: Furious with water supply: