‘त्या’ चौघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: September 20, 2014 00:28 IST2014-09-20T00:18:28+5:302014-09-20T00:28:40+5:30
औरंगाबाद : सुरतजवळ रस्ता अपघातात औरंगाबादेतील मृत्युमुखी पडलेल्या स्वप्नील बाबूराव कदम, अरविंद जनार्दन पंडित, अनिल कांबळे व जनार्दन ससाणे या चौघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘त्या’ चौघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
औरंगाबाद : सुरतजवळ रस्ता अपघातात औरंगाबादेतील मृत्युमुखी पडलेल्या स्वप्नील बाबूराव कदम, अरविंद जनार्दन पंडित, अनिल कांबळे व जनार्दन ससाणे या चौघांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी (दि.१९) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्वप्नील कदम, अरविंद पंडित यांच्या पार्थिवावर भावसिंगपुरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भदन्त उपगुप्त महाथेरो, भन्ते संघपाल, भन्ते नागसेन यांनी बुद्धवंदना घेऊन धम्मदेसना दिली.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, रिपाइंचे अॅड. गौतम भालेराव, मिलिंद शेळके, राष्ट्रवादीचे मनमोहनसिंग ओबेरॉय, कदीर मौलाना यांनी श्रद्धांजली वाहिली. बाबूराव कदम व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.