शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ४५ लाखांचा निधी, पण शाळांची उदासीनता!

By विजय सरवदे | Updated: May 28, 2025 20:24 IST

गेल्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शासनाने शाळांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू केले होते.

छत्रपती संभाजीनगर : शासनाकडून अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेकरिता तब्बल ४५ लाखांचा निधी मंजूर आहे. पण, बहुतांश शाळांनी या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे शिफारस प्रस्तावच (याद्या) जि. प. समाजकल्याण विभागाकडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात सुमारे पावणेपाच हजार शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी शाळांना २२ मे ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, १ मेपासून उन्हाळी सुट्ट्या लागल्या आणि शाळाच बंद झाल्या. परिणामी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायची ‘शिफारस’च सरकारी दफ्तरात पोहोचली नाही. त्यामुळे प्रस्तावांची वाट जून-जुलैमध्ये पाहावी लागणार आहे, असे जि. प. समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे, गेल्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शासनाने शाळांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू केले होते. तांत्रिक अडचणीमुळे १२ मार्च २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे बहुतांश शाळांचे प्रस्ताव रखडल्याचे बोलले जाते. यामध्ये प्रामुख्याने वैजापूर व छत्रपती संभाजीनगर तालुक्यांचा समावेश आहे.

या आहेत शिष्यवृत्ती योजना...- अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती : इयत्ता ८ वी ते १० वीमधील अनु. जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. जून ते मार्च असे दरमहा १०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती : अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या अनु. जाती प्रवर्गातील पालकांच्या ९वी, १०वीतील पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते.- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती : दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते.- धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती : अस्वच्छ व्यवसाय व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते.- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे योजना : मॅट्रिकपूर्व शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. यात शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क दिले जाते.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीScholarshipशिष्यवृत्तीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSchoolशाळा