शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

४५२ कोटींच्या निधीने ‘दुधना’च्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 02:12 IST

परभणी : जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या लोअर दुधना प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई ’ योजनेमध्ये समावेश झाला

परभणी : जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या लोअर दुधना प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई ’ योजनेमध्ये समावेश झाला असून शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ४५२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोअर दुधना प्रकल्पाला ५ मे १९७९ रोजी मान्यता मिळाली होती. त्यावेळी २२ गावांमधील ५ हजार हेक्टर जमीन अधिग्रहित केली होती. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २८ कोटी होती. त्याचवेळी हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज परभणी जिल्ह्याचे चित्र वेगळे राहिले असते. परंतु, त्यावेळी या प्रकल्पाला निधी देताना आखडता हात घेतला गेला. १९९२ मध्ये प्रकल्पाला पुन्हा ४८ कोटी रुपये निधी दिला. वाढणाऱ्या साहित्याच्या किमती व जमिनीचा दर याबाबी लक्षात घेता मिळालेला निधी अपुरा पडला. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर परभणी, सेलू, जिंतूर आदी तालुक्यातील ३४ हजार ४३८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असती. परंतु, या प्रकल्पासाठी वेळोवेळी निधी मिळाला नाही. परिणामी प्रकल्पाचा खर्च जवळपास १ हजार कोटींपर्यंत गेला. आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास ९०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४५२ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता थांबलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ववत सुरु होणार आहे. परिणामी ज्या उदात्त हेतुने या भागात प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. तो हेतू साध्य होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या कामाची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात करणे आवश्यक आहे. कमी होत चाललेल्या पावसामुळे सद्यस्थितीत रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ज्यामुळे दुष्काळावर मात करता येणार आहे. थेट प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाने केल्याने या कामाच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड होऊ नये, याकडे केंद्र व राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.