शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कोट्यातून एमबीबीएस प्रवेश याचिकांची सुनावणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:36 IST

उद्या निकाल अपेक्षित; सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानुसारच प्रवेश मिळणार

औरंगाबाद : एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ‘अनिवासी भारतीयांच्या’ (एनआरआय) कोट्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘राज्याच्या कोट्यातून’ (स्टेट कोटा) प्रवेश देण्याची आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्याची विनंती करणाºया याचिकांवरील सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पूर्ण झाली. न्या.आर. एम. बोर्डे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी सर्व याचिका निकालासाठी राखून ठेवल्या. निकाल २३ आॅगस्ट रोजी अपेक्षित आहे.सुनावणीच्या वेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे हजर होते. खंडपीठाने प्रवेश नियमावलीतील विविध नियमांबाबत ‘सीईटी’ सेल आणि राज्य शासनाकडून माहिती घेतली. एमबीबीएस प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार आणि प्रवेश नियमानुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील, असे मंगळवारच्या सुनावणीअंती स्पष्ट झाले. सीईटी सेलने एमबीबीएस प्रवेशाच्या दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १२ आॅगस्टला जाहीर केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत शनिवारची होती. विद्यार्थ्यांनी १८ आॅगस्टला निवड झालेल्या कोट्यातून प्रवेश घेतले नाही, तर ते पुढील प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार होते. उपरोक्त गुणवत्ता यादीत ज्यांची निवड ‘अनिवासी भारतीयांच्या’ कोट्यातून झाली आहे. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल करून त्यांना ‘राज्याच्या कोट्यातून’ (स्टेट कोटा) प्रवेश देण्याची आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्याची विनंती केली.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य कोटा आणि अनिवासी भारतीय कोट्यातील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ढोबळमानाने चार ते पाच पटींचा फरक आहे. राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर, सीईटी सेलतर्फे अ‍ॅड. मृगेश नरवाडकर आणि अ‍ॅड. सुजित कार्लेकर, केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे आदींनी काम पाहिले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद