फुलंब्री नगर पंचायत निवडणुक ; आज थंडावणार प्रचारतोफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:26 IST2017-12-10T23:26:41+5:302017-12-10T23:26:45+5:30
फुलंब्री : येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचारतोफा आज थंडावणार आहेत.

फुलंब्री नगर पंचायत निवडणुक ; आज थंडावणार प्रचारतोफा
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : येथील नगर पंचायत निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचारतोफा आज थंडावणार आहेत.
या प्रचारात तीन पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केली असून भाजपसोबत त्यांची लढत सुरु आहे. या नगर पंचायतवर गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक आहेत. या काळात शहरात विकास कामे झालेली नाही. त्यामुळे नागरिक निवडणुकीची प्रतीक्षा करीत होते.
अखेर निवडणूक जाहीर झाली आणि आता मतदान १३ डिसेंबरला होणार आहे. एकीकडे भाजपचे पॅनल तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन शहर विकास
आघाडी करून पॅनल उभे केले
आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ आहे.