शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

सलग ११ व्या दिवशीही इंधन दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:04 AM

औैरंगाबाद : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता वाहनही तेवढेच अत्यावश्यक बनले आहे. यामुळे पेट्रोल -डिझेलमधील भाववाढीचा फटका थेट सर्वसामान्यांपर्यंत बसत ...

औैरंगाबाद : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता वाहनही तेवढेच अत्यावश्यक बनले आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलमधील भाववाढीचा फटका थेट सर्वसामान्यांपर्यंत बसत आहे. इंधनात १४ मेपासून सुरू झालेली भाववाढ आता उच्चांकावर येऊन पोहोचली आहे. सलग ११ व्या दिवशीही दरवाढीचा ज्वालामुखी उसळलेलाच होता. गुरुवारी पेट्रोल ८६.३१ रुपये, तर डिझेल ७३.९९ रुपये प्रतिलिटरने विकल्या जात होते. मागील ११ दिवसांत पेट्रोल प्रतिलिटरमागे २.६५ रुपये, तर डिझेल २.५४ रुपयांनी वधारले आहे. वाहनही जीवनावश्यक असल्याने भाव वाढले, तरीही नागरिक पेट्रोल खरेदी करीत आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांनाही भाववाढ मान्य आहे. प्रत्येक वाहनधारक संताप व्यक्त करीत आहे. केंद्र सरकार या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर पसरला आहे.महिन्याचा खर्च तीस टक्क्यांनी वाढणारपेट्रोल आणि डिझेलमध्ये दिवसेंदिवस जी दरवाढ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. दर महिन्याला इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झालेलीच असते. त्यामुळे दर महिन्याला वेगळे आर्थिक गणित मांडण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे, असे मत व्यावयायिक अमित कुलकर्णी यांनी मांडले.पती-पत्नी, दोन शालेय शिक्षण घेणारी मुले आणि आई, असा अमित यांचा परिवार असून, त्यांच्याकडे डिझेलवर चालणारी चारचाकी आणि दोन दुचाकी आहेत. अमित आणि शीतल हे दाम्पत्य वेगवेगळा व्यवसाय करतात. महिन्याला सात ते आठ हजार रुपये त्यांचा इंधनावर खर्च होतो.इंधन भाववाढीवर बोलताना अमित म्हणाले की, यामुळे आता किराणा सामानापासून ते मुलांच्या शाळेच्या रिक्षापर्यंत सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार आहे. शाळा सुरू झाल्यावर रिक्षावालेही १५०-२०० रुपयाने निश्चितच वाढ करतील.इंधनवाढीचा परिणाम जीवनावश्यक गोष्टींवर निश्चितच होतो; पण त्यामुळे आपण जीवनावश्यक गोष्टी घेणे टाळू शकत नाही. त्यामुळे मला दर महिन्याला इंधनावर जो खर्च करावा लागतो त्यामध्ये आता ३० टक्के वाढ होणार असल्याचे दिसून येते. हा अतिरिक्त खर्च मला आणि इतर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या बचतीमधूनच करावा लागणार आहे. इंधनाच्या दरावर पूर्वी केंद्र सरकारचे नियंत्रण असायचे, आता त्यामध्ये जे विकेंद्रीकरण झाले आहे त्याचा हा दुष्परिणाम आहे.अमित यांचा जेसीबी आणि पोकलेन मशीन भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल लागत असल्यामुळे इंधन भाववाढीचा परिणाम व्यवसायावरही झाला आहे. त्यामुळे व्यवसायातले मार्जिन कव्हर करणे अवघड होत असून, आॅपरेटिंग कॉस्ट वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Petrolपेट्रोलAurangabadऔरंगाबाद