फळभाज्या महाग; गृहिणी चिंतेत

By Admin | Updated: June 16, 2014 01:10 IST2014-06-16T00:50:51+5:302014-06-16T01:10:39+5:30

औरंगाबाद : मेथी, कोथिंबीर १० रुपये गड्डी, कारले, दोडके ६० ते ८० रुपये किलो, फुलगोबी ६० रुपये किलो हे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत.

Fruitful expensive; Housewife worried | फळभाज्या महाग; गृहिणी चिंतेत

फळभाज्या महाग; गृहिणी चिंतेत

औरंगाबाद : मेथी, कोथिंबीर १० रुपये गड्डी, कारले, दोडके ६० ते ८० रुपये किलो, फुलगोबी ६० रुपये किलो हे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत.
पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने घरातील महिन्याचे बजेट बिघडले आहे. महागाईमुळे आज कोणती भाजी करावी, असा प्रश्न गृहिणींना पडत आहे.
पावसाळा सुरू झाला; पण अपेक्षित पाऊस पडला नाही. मागील आठवड्यात तर पावसाने दडीच मारली. परिणामी, शेतातील पालेभाज्या, फळभाज्या पाण्याअभावी खराब होऊ लागल्या आहेत. जाधववाडीतील मोंढ्यात आवक घटल्याने शहरात भाजीपाला महागला आहे.
एरव्ही ३ ते ४ रुपयांत मिळणारी मेथी व कोथिंबिरीची गड्डी १० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. किलोभर कारले किंवा दोडके विकत घेण्यासाठी ८० रुपये मोजावे लागत
आहेत.
गवार शेंग ५० ते ६० रुपये, फुलगोबी ६० रुपये, दुधीभोपळा, पत्ताकोबी प्रत्येकी ३० रुपये, टोमॅटो २५ रुपये किलोने विकले जात
आहेत.
यात काकडीचाही भाव चढला असून ४० रुपयांखाली काकडी विकत मिळतच नाही. काही नसेल तर बटाट्याची भाजी केली जाते; पण बटाटाही २५ ते ३० रुपये किलोने मिळत आहे. सध्या पालक ५ रुपये गड्डी मिळत आहे.
औरंगपुरा भाजीमंडईत काही जण एक किलोऐवजी अर्धा किंवा पावशेर भाजी खरेदी करण्यातच समाधान मानत आहेत. पल्लवी राजपूत या गृहिणीने सांगितले की, भाजी विक्रेते नफा कमी करून भाज्या विक्री करीत नाहीत आणि खराब झाल्यावर भाज्या फेकून देतात. नफा कमी केल्यास सर्व भाज्या विकल्या जातील, फेकून देण्याची वेळ येणार नाही.
हातगाडीवाले गायब
भाज्यांचे दर कमी असतील तेव्हा गल्लीबोळात भाजी विक्रेते हातगाडी घेऊन फिरतात. मात्र, भाज्या महागल्याने हातगाडीवाले गायब झाले आहेत. कारण, महागड्या भावात त्यांच्याकडून कोणी भाजी खरेदी करीत नाही. परिणामी, सध्या भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांना भाजीमंडीतच जावे लागत आहे.
वरून चांगला
आतून सडलेला
खराब कांद्याची बाजारात आवक होत आहे. वरून चांगला व आतून सडलेला कांदा जास्त प्रमाणात येत आहे. परिणामी, चांगल्या कांद्याचा भाव चढला असून कांदा प्रतिकिलोे २५ ते ३० रुपये विकला जात आहे.

Web Title: Fruitful expensive; Housewife worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.