इस्त्राईलच्या निषेधार्थ मोर्चा
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:55:33+5:302014-08-23T00:45:30+5:30
परभणी: फिलिस्तान येथे इस्त्राईलच्या वतीने होत असलेल्या नरसंहाराचा निषेध नोंदविण्यासाठी टॉप फाऊंडेशनच्या वतीने २२ आॅगस्ट रोजी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

इस्त्राईलच्या निषेधार्थ मोर्चा
परभणी: फिलिस्तान येथे इस्त्राईलच्या वतीने होत असलेल्या नरसंहाराचा निषेध नोंदविण्यासाठी टॉप फाऊंडेशनच्या वतीने २२ आॅगस्ट रोजी शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.
शहरातील इदगाह मैदान येथून हा मोर्चा निघाला होता. सरकारी दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागात मोर्चा पोहचला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघाला. स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे हा मोर्चा पोहचल्यानंतर सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, इस्त्राईलतर्फे स्वसंरक्षणाच्या नावाखाली गाजा येथे सर्व सामान्य नागरिक, महिला व बालके व तरुणांवर अत्याचार होत आहेत. निष्पांपाचे बळी घेतले जात आहेत. भारत सरकारने गाझावर होणाऱ्या अन्यायाची गांभिर्याने दखल घेऊन या प्रकरणात इस्त्राईलला रोखण्यासाठी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. या निवेदनावर अॅड. अफजल बेग, अॅड. विष्णू नवले, डॉ. सय्यद खिजर, अॅड. सुनील कदम, शेख नसिरोद्दीन, अॅड. सय्यद जुनैद आदींच्या सह्या आहेत.(प्रतिनिधी)