‘औट घटके’च्या सदस्यत्त्वाकडे ्नगावपुढाऱ्यांनी फिरविली पाठ

By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-10T00:19:08+5:302015-04-10T00:26:48+5:30

कळंब : शौचालयाचा वापर न करणाऱ्या कळंब तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या ३७ सदस्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवण्याची कारवाई केली केल्यानंतर आता या रिक्त जागांसाठी

In front of the membership of 'Oat Vidyakte' | ‘औट घटके’च्या सदस्यत्त्वाकडे ्नगावपुढाऱ्यांनी फिरविली पाठ

‘औट घटके’च्या सदस्यत्त्वाकडे ्नगावपुढाऱ्यांनी फिरविली पाठ


कळंब : शौचालयाचा वापर न करणाऱ्या कळंब तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या ३७ सदस्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवण्याची कारवाई केली केल्यानंतर आता या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे. परंतु यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २८ जागांपैकी केवळ चार जागासाठी अर्ज आले असून, ‘औट घटकेसाठी’ असलेले हे सदस्यत्त्व मिळविण्यासाठी गावपुढारी अनुत्सुक असल्याचे यावरून दिसते.
तालूक्यात ९१ ग्रामपंचायतीअ सून, यापैकी ५९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक एका टप्पयात होते. उर्वरित ग्रापच्या निवडणूका अन्य वेळी पार पडतात. यापैकी २०१० मध्ये निवडणूक झालेल्या ग्रा.पं. सदस्यानी १० जानेवारी २०११ ते १० जानेवारी २०१२ दरम्यान शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र व ठराव गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक होते. परंतू, तालुक्यातील ३७ सदस्यांनी असे प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर केले नाही. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त तरतूदीचा वापर करुन या ११ गावातील ३८ सदस्यांना पदावरुन अपात्र ठरवण्याची कार्यवाही केली होती. यातील कोठाळवाडी व चोराखळी येथील सदस्य विभागिय आयुक्त कार्यालयात अपिलात गेल्याने त्यांना त्याठिकाणी दिलासा मिळाला होता. ही दोन गावे वगळता उर्वरित नऊ गावातील २८ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये वाकडी इस्थळ येथील चार, वडगाव (शि) येथील १, इटकूर २, वाणेवाडी ३, शिंगोली ७, भाटसांगवी २, आडसूळवाडी ६, तर बोरवंटी व खोंदला येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: In front of the membership of 'Oat Vidyakte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.