शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाकचेरीवर घरकुलासाठी मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 00:38 IST

नांदेड : एनटीसी मिल भागातील नागरिकांनी घरकुलासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला़

नांदेड : एनटीसी मिल भागातील नागरिकांनी घरकुलासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला़ नांदेड टेक्सटाईल मिल घरकुल कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला़ एनटीसी मिल परिसरातील नल्लागुटाचाळ, देगावचाळ, भय्यासाहेब आंबेडकरनगर, भीमघाट, गोलचाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ येथील झोपडीपट्टी धारकांना घरकुले बांधून देण्याचा प्रस्ताव रेंगाळल्याने येथील लाभार्थ्यांनी सहभाग घेतला़ यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देवून घरकुले देण्याची मागणी करण्यात आली़ तसेच या परिसरात भीमघाट येथे ३३ के़ व्ही़ विज केंद्र उभारले आहे़ पक्कीचाळ येथे पोलिस चौकी उभारली आहे़ खडकपुरा येथे जलकुंभ, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे़ या सर्व उभारणीसाठी नांदेड टेक्सटाईल मिल प्रशासनाने परवानगी दिली़ मात्र गोरगरीबांच्या घरकुलासाठी परवानगीच्या नावाखाली अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ मोर्चात कृती समितीचे अध्यक्ष श्रीधर हटकर, नारायणराव सदावर्ते, मिलिंद शिराढोणकर, भगवान ढगे, सत्यानंद शिवरात्री, संजय टिके, संजय वाघमारे, साहेबराव थोरात, अनिल गोडबोले, पंजाला सुरेश, सुभाष लोखंडे, सतीश हिंगोले, संतोष नरवाडे, भगवान तारू, कामाजी लांडगे, सुरेश सावळे, ईश्वर चित्रपु, शिवराम कॅकला, सुरेश हाटकर, स़ सलीम स़ उमर, शे़ फारूख शे ़ दाऊद, श्रावण नरवाडे, साहेबराव शेंडेराव, राम स्वामी रेगुला, नंदु खाडे, नंदू जोंधळे, नामदेव दिपके, अनिल लांडगे, गणेश सावंत, नुमाजी खाडे, केशव थोरात, शेख अकबर, शेख रहेमत अलू, संभाजी नरवाडे, लताबाई वाघमारे, संजिवनी सावळे आदींनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)