शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

बाजारात फळांच्या राजापासून द्राक्षांपर्यंत फळांची रेलचेल, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 14, 2024 11:29 IST

आंब्यांपासून ते द्राक्षांपर्यंत सर्वच रसाळ फळे उपलब्ध झाल्याने हा काळ खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगर : रसाळ फळांची बाजारात जणू जत्रा बहरली आहे. शहागंजात तर फळांचा सर्वांत मोठा बाजार बहरला आहे. फळांचा राजा आंब्यापासून ते द्राक्षांपर्यंत सर्व फळे सध्या बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. विशेष म्हणजे, रमजान महिन्याला सुरूवात होण्यापूर्वीच बाजारात सुमारे ५० टन फळांची आवक झाली आहे.

लालबाग, बदाम बाजारातफेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बंगळुरूहून बदाम आंबा आला होता. त्यानंतर लालबाग आंबा सर्वत्र दिसू लागला. काही ठराविक हातगाड्यांवर व फळांच्या दुकानात सध्या तुरळक आंबे विक्रीला उपलब्ध झाले आहेत. आता रत्नागिरीच्या हापूस आंब्याची प्रतीक्षा केली जात आहे.

केळीच डझनावर; बाकी फळ किलोवरपूर्वी काही फळे ही डझनावर विकली जात होती. आता फक्त केळीच डझनावर विकली जातात. अन्य सर्व फळे किलोवर विकली जात आहेत.

रोजा सोडण्यासाठी फळांचा वापरफळांचे सेवन करून रमजान महिन्यात सायंकाळी रोजा (उपवास) सोडला जातो. यामुळे बाजारात ८० ते १०० टनांपेक्षा अधिक फळांची दररोज विक्री होते. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० टन फळांची आवक झाली. आता दररोज फळांची आवक वाढून १०० टनापर्यंत जाऊन पोहोचेल, अशी माहिती जुनेद खान यांनी दिली.

फळांचे आजचे भावफळ किंमत (किलो)लालबाग आंबा १६० ते २०० रु.बदाम १०० ते १२० रु.पपई ४० ते ५० रु. (नग)टरबूज २० ते २५ रु.खरबूज ४० ते ५० रु.चिकू ५० ते ६० रु.द्राक्ष ५० ते ६० रु.पेरू ५० ते ६० रु.अंजीर ६० ते ७० रु.डाळींब १०० ते १५० रु.संत्रा ३० ते ५० रु.अननस ६० ते ७० रु. (नग)किवी १०० ते १२० रु. (३ नग)मोसंबी ५० ते ६० रु.सफरचंद १५० रु.

खवय्यांसाठी पर्वणीचआंब्यांपासून ते द्राक्षांपर्यंत सर्वच रसाळ फळे उपलब्ध झाल्याने हा काळ खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. गावरान पेरू, आंबे; शिवाय इराणी सफरचंदेही मिळत आहेत. ५० ते १५० रुपये किलो दरम्यान फळे मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकही दररोज वेगवेगळी फळे विकत घेत आहेत.

टॅग्स :fruitsफळेAurangabadऔरंगाबादMarketबाजार