छत्रपती संभाजीनगर: निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शहरातील प्रसिद्ध रीलस्टार विशाल राठोड ऊर्फ 'लाला' याच्या विलासी आयुष्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर स्वतःचे 'लार्जर दॅन लाईफ' चित्र रंगवणारा हा तरुण केवळ ५० लाख रुपयांच्या वादातून खुनी बनल्याने त्याचे लाखो चाहते अवाक् झाले आहेत.
डिजिटल दुनियेचा 'किंग'विशालचे इन्स्टाग्रामवर तब्बल १ लाख ७५ हजार फॉलोअर्स आहेत. २०१९ मध्ये साधे व्हिडीओ बनवण्यापासून सुरुवात करणाऱ्या विशालने अल्पावधीतच 'लाला' या नावाने डिजिटल विश्वात स्वतःचे ग्लॅमर निर्माण केले. महागड्या कार, हाय-एंड स्मार्टफोन्स आणि ऐषोआरामाचे प्रदर्शन करणारे त्याचे व्हिडीओ तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. विशेष म्हणजे, अवघ्या २३ व्या वर्षी त्याने 'जॅग्वार' ही लक्झरी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ शेअर करून मोठी खळबळ उडवून दिली होती.
बड्या नेत्यांशी संपर्क आणि सन्मानविशालचे केवळ सोशल मीडियावरच नाही, तर राजकीय वर्तुळातही वजन असल्याचे दिसून येते. नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्याचा डिजिटल योगदानाबद्दल सन्मान झाला होता. अनेक महाविद्यालयांमध्ये तो प्रमुख पाहुणा म्हणून जात असे, तर शोरूमच्या उद्घाटनासाठी त्याला निमंत्रित केले जात होते. काही रॅप आणि म्युझिक अल्बममध्येही त्याने काम केले आहे. मात्र, या सर्व ग्लॅमरच्या आड त्याने ५० लाखांच्या उसने पैशांसाठी आपल्याच मित्राचा 'दृश्यम' स्टाईलने काटा काढला. एसटी आरक्षण आंदोलनासारख्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवणारा हा तरुण इतका क्रूर कसा असू शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Web Summary : Instagram star 'Lala' killed his friend over a ₹50 lakh debt. Known for luxury cars and a large following, his double life shocked many. He was even honored by ministers.
Web Summary : इंस्टाग्राम स्टार 'लाला' ने 50 लाख रुपये के कर्ज के चलते अपने दोस्त की हत्या कर दी। लग्जरी कारों और बड़ी फॉलोइंग के लिए जाने जाने वाले, उनके दोहरे जीवन ने कई लोगों को चौंका दिया। उन्हें मंत्रियों द्वारा सम्मानित भी किया गया।